नवी दिल्ली 03 मार्च : पैशाची गरज माणसाला आंधळा बनवते. मग काय बरोबर आणि काय अयोग्य हेही समजत नाही. अशा स्थितीत माणूस अनेकदा अशा चुका करतो, ज्याचा त्याला पश्चाताप होतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. भरमसाठ पैसे मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर चोरी करायला गेलेल्या एका चिनी माणसासोबतही असंच घडलं. चोरी केल्यानंतर त्याला आपली चूक झाल्याचं समजलं आणि मग तो पोलिसांची भीती बाळगू लागला. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार, 2009 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातील एन्शी शहरातील एका गावातील 30 वर्षीय रहिवासी लिऊ मोफूने त्याच्या नातेवाईक आणि इतर साथीदारांसह पेट्रोल पंप लुटण्याचा एक प्लॅन बनवला होता. सामान्यतः पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांजवळ भरपूर रोकड असते, पण लिऊचे नशीब वाईट होते की त्या तिघांनाही केवळ 156 युआन म्हणजे सुमारे 1800 रुपये मिळाले. हलवा बनवताना महिलेचं किळसवानं कृत्य, Video पाहून खाण्याचीही इच्छा जाईल या 1800 रुपयांपैकी सुमारे 60 युआन (रु. 716) त्याने काहीच काळात खाणे, पिणे आणि आनंद साजरा करण्यासाठी खर्च केले. तिघांनीही उरलेले पैसे आपापसात वाटून घेतले आणि प्रत्येक व्यक्तीकडे फक्त ३२ युआन (३८२ रुपये) शिल्लक राहिले. तिघेही एकमेकांपासून वेगळे होऊन आपापल्या वाटेला गेले. मात्र काही वेळातच पोलिसांनी लिऊच्या साथीदाराला अटक केली. एका साथीदाराच्या माध्यमातून पोलीस त्याच्यापर्यंत सहज पोहोचतील हे लिऊला माहीत होते. त्यामुळे त्याला अटक होण्याची भीती होती. त्याला तुरुंगात जायचं नव्हतं. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला. तुरुंगात आयुष्य घालवण्याऐवजी स्वतःच तुरुंग बांधून स्वतःला त्यात कैद करण्याचा निर्णय त्याने घेतला. स्वत:च्या तुरुंगाचा अर्थ खरं तुरुंग असा नाही, तर लिऊने ठरवलं की पोलिसांपासून वाचण्यासाठी तो काही दिवस गुहेत लपून राहील. लवकरच दिवस जाऊ लागले आणि त्या व्यक्तीने 1-2 नाही तर संपूर्ण 14 वर्षे त्या गुहेत घालवली. OMG! 26 वर्षीय तरुणाची 800 वर्षांची गर्लफ्रेंड, बेडवरही सोबतच झोपायचा, शेवटी समोर आलं हादरवणारं सत्य तो मध्येच गुहेतून बाहेर पडायचा, 10-15 मिनिटांसाठी त्याच्या गावी जायचा आणि बटाटे, टोमॅटो अशा भाज्या चोरायचा आणि त्याच्या कुटुंबालाही भेटायचा. मात्र त्याला इतर कोणी पाहिल्यावर ते पोलिसांना कळवायचे, त्यानंतर त्याला पुन्हा पळून जावे लागायचे. लोकवस्तीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात असलेल्या गुहेत या माणसाने 14 वर्षे घालवली. तो पूर्णपणे एकटा होता. त्याच्यासोबत फक्त काही भटके कुत्रे होते, ज्यांच्या मदतीने तो वन्य प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करत असे. कुटुंबापासून दूर, वडिलांचे अंतिम संस्कार, मुलाचे लग्न आणि नातवाचा चेहराही त्याला पाहता आला नाही. आपल्या जीवाला कंटाळून त्याने या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. गंमत म्हणजे या व्यक्तीने 14 वर्षे स्वत:च्या तुरुंगात काढली, पण आता त्याच्यावर कोर्टात खटला चालवला जाईल आणि दोषी ठरल्यास त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल, तर चोरीमध्ये शस्त्र वापरल्याचे सिद्ध झाले तर त्याची शिक्षा 10 वर्षांपर्यंत केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.