नवी दिल्ली, 2 मार्च : सोशल मीडियावर अनेक भिन्न भिन्न प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. दिवसभरात अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. यापैकी काही मजेशीर, विचित्र, धक्कादायक, आश्चर्यकारक, व्हिडीओंचा समावेश असतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला असून महिलेचं किळसवानं कृत्य कॅमेऱ्याद कैद झालं आहे. हा व्हिडीओ चर्चेत आला असून ट्रोलदेखील होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला बाहेर बसून हलव्यासारखा पदार्थ बनवताना दिसत आहे. यानंतर त्याने जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसेल. ज्या भांड्यात ती हलवा बनवत होती त्या भांड्यात ती उलटी करते आणि नंतर त्यामध्ये मिक्स करते. हे बघून इंटरनेटवरील लोकांची नाराजी पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
mixfood_hunter ने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. व्हिडीओवर पाहून अनेकांना किळस वाटली असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे समोर आलं नाही मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेक विचित्र प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपण विचारही करु शकत नाही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही ठिकाणच्या विचित्र परंपरांचेही व्हिडीओ समोर येत असतात.