नवी दिल्ली 02 मार्च : जेव्हा लोक अविवाहित असतात तेव्हा त्यांना अशी आशा असते की त्यांना लवकरात लवकर एक गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळेल आणि ते त्यांच्यासोबत जीवनाचा आनंद घेऊ शकतात. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की एखादी व्यक्ती गर्लफ्रेंड बनवायला एवढी उत्सुक असते की ती एखाद्या मृतदेहाच्या प्रेमात पडते. नक्कीच, अशा व्यक्तीला तुम्ही वेडा म्हणाल, परंतु प्रत्यक्षात अशी व्यक्ती जगात अस्तित्वात आहे. ज्याला नुकतीच पेरूमध्ये अटक करण्यात आली आहे ‘…आता आपलं ब्रेकअप झालं’; तरुणाने गर्लफ्रेंडला पत्र पाठवत मागितली सही, कारण वाचून लावाल डोक्याला हात डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय ज्युलियो सीझर बर्मेजो हा पेरू येथील एक डिलिव्हरी ड्रायव्हर असून त्याला अलीकडेच ममीसह अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आलं आहे की त्या व्यक्तीने ममीचं नाव जुआनिता ठेवलं होतं आणि तो तिला आपली गर्लफ्रेंड मानत होता. एवढंच नाही तर त्या गर्लफ्रेंडला बेडवर झोपवूनच तो झोपायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती ममी 800 वर्षे जुनी होती. पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी ज्युलिओला पुरातत्व स्थळावरून अटक केली जिथे तो त्याच्या मित्रांसह बिअर पिण्यासाठी आला होता. सोबतच त्याने मृतदेहही आणला होता जेणेकरून तो त्याच्या मित्रांना दाखवता येईल. मात्र, ज्युलिओने आपल्या हे प्रेत विकायचं नव्हतं, असं सांगितलं. पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुपूर्द केली. ज्युलिओने सांगितलं की, त्याच्या वडिलांनी त्याला ही ममी दिली, जी त्याच्या कुटुंबात गेल्या 30 वर्षांपासून होती. मात्र, ती त्याच्या वडिलांकडे कुठून आली, याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांनी ज्युलिओ आणि त्याच्या मित्रांना अटक केली, परंतु मृतदेहाची तपासणी केल्यावर सर्वात वाईट बातमी समोर आली. इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा? ज्युलिओने ज्याला स्त्रीचे प्रेत समजून आपली गर्लफ्रेंड बनवलं होतं, ती प्रत्यक्षात पुरुषाचीच ममी होती. तो 600 ते 800 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या 45 वर्षांपर्यंतच्या पुरुषाचा मृतदेह असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्या मृतदेहाची उंची 5 फुटांपेक्षा कमी होती, म्हणजेच ती आताच्या पुरुषांच्या सरासरी उंचीपेक्षा कमी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.