Home /News /pune /

फेसबुकवर मैत्री करत पंजाबमधील युवकाचा पुण्यातील विवाहितेवर बलात्कार, स्टेटसला ठेवले अश्लील VIDEO

फेसबुकवर मैत्री करत पंजाबमधील युवकाचा पुण्यातील विवाहितेवर बलात्कार, स्टेटसला ठेवले अश्लील VIDEO

Rape in Pune: सोशल मीडियाद्वारे ओळख (Social media friendship) झाल्यानंतर, पंजाबमधील एका तरुणानं पुण्यातील विवाहित महिलेवर बलात्कार (Rape on married woman) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 16 जुलै: सोशल मीडियातून ओळख (Social media friendship) झाल्यानंतर, पंजाबमधील एका तरुणानं पुण्यातील विवाहित महिलेवर बलात्कार (Rape on married woman) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्यानं पीडित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील शूट (Shoot obscene videos) केले आहेत. संबंधित व्हिडीओ डिलीट करण्यासाठी आरोपीनं पीडित महिलेकडे तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी (Demand 1 crore Rs) केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सौरभ सुभाषचंद्र सुखिजा असं गुन्हा दाखल झालेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी सुखिजा हा पंजाबमधील पटियाला येथील रहिवासी आहे. त्याची 2019 मध्ये फेसबुकद्वारे फिर्यादी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. काही दिवसांनी आरोपी सुखिजा खास फिर्यादीला भेटण्यासाठी पंजाबहून पुण्याला आला होता. दरम्यान त्यानं फिर्यादीच्या राहत्या घरातचं तिच्यावर बलात्कार केला आहे. हेही वाचा-बायकोनं ‘अशी’ पकडली नवऱ्याची Love Affairs, लंपट पतीला झाली ‘पळता भुई थोडी’ आरोपीनं फिर्यादी महिलेस सरबतातून गुंगीचं औषध दिलं. पीडित महिलेला भूल आल्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ चित्रीत केले. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ आणि फोटो आपल्या Whatsapp स्टेटसला देखील ठेवले. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं संबंधित व्हिडीओ आणि फोटो परत करण्याच्या बदल्यात पीडित महिलेकडे तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. हेही वाचा-लव्ह, सेक्स आणि..! विवाहित प्रियकरानं गर्लफ्रेंडचा घेतला सूड; आयुष्य उद्धवस्त आरोपी तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पंजाबमधील पटियाला येथील रहिवासी असणाऱ्या सौरभ सुखिजा विरोधात बलात्कारसह खंडणी आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसून चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच लवकरत आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape

    पुढील बातम्या