Home /News /kolhapur /

गुटखा पुडी न दिल्यानं तरुणाची सटकली; तलवारीनं मित्रावरच केला जीवघेणा हल्ला

गुटखा पुडी न दिल्यानं तरुणाची सटकली; तलवारीनं मित्रावरच केला जीवघेणा हल्ला

Crime in Kolhapur: हातकणंगले येथील एका तरुणानं गुटखा पुडी न दिल्याच्या (Not giving gutkha) कारणातून आपल्याच मित्रावर तलवारीनं जीवघेणा हल्ला (Deadly sword attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    हातकणंगले, 16 जुलै: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील एका तरुणानं गुटखा पुडी न दिल्याच्या (Not giving gutkha) कारणातून आपल्याच मित्रावर तलवारीनं जीवघेणा हल्ला (Deadly sword attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संबधित तरुण गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा तीन आरोपींना ताब्यात (3 Arrest) घेतलं असून अन्य एक आरोपी सध्या फरार आहे. संबंधित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. कुणाल सुनील सावंत असं हल्ला झालेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो कबनूर येथील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी कुणाल आपल्या घराच्या परिसरात मोबाइलवर गेम खेळत बसला होता. तेवहा आरोपी शुभम पट्टणकुडे त्याठिकाणी आला. त्यानं कुणालकडे गुटख्याची मागणी केली. पण कुणालनं माझ्याकडे एवढा एकच गुटखा असल्याचं सांगत पुडी द्यायला नकार दिला. गुटखा देण्यास कुणालनं नकार दिल्यानं शुभमला संताप अनावर झाला. हेही वाचा-VIDEO:फरसाण न दिल्यानं दुखावला आत्मसन्मान;लॉकडाऊनचं कारण देत पोलिसानं घेतला बदला यानंतर आरोपी शुभमनं सोन्या ऊर्फ सदीप पाटील, सिद्धू आणि शिवा शिंगे अशा चार मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. हे सर्व आरोपी घटनास्थळी आपली दुचाकी घेऊन आले. यानंतर शुभमने आरोपींनी सोबत आणलेल्या तलवारीनं कुणालवर हल्ला केला. अन्य आरोपींनी देखील कुणालला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तलवारीनं हल्ला केल्यामुळे कुणाल गंभीर जखमी होऊन घटनास्थळी कोसळला. विशेष म्हणजे आरोपी शुभम आणि जखमी कुणाल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. हेही वाचा-पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; अंत्यसंस्काराच्या वेळी उलगडलं हत्येचं गूढ कुणाल खाली कोसळल्याचं पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर परिसरातील लोकांनी कुणालला तातडीनं एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशीरा पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम पट्टणकुडेसहित सोन्या आणि सिद्धू अशा तीन आरोपींना अटक केली आहे. चौथा आरोपी शिवा शिंगे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या