Home /News /viral /

खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेतच साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO

खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेतच साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO

शिकारीचा हा व्हिडीओ पाहून धडकीच भरते.

    मुंबई, 03 सप्टेंबर :  शिकारीचे (Animal hunting video) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी वाऱ्याच्या वेगाने पळत झडप (Animal attacking video) घालून आपली शिकार धरतात. या प्राण्यांना जमिनीवर शिकार करताना तुम्ही पाहिलंच आहे. पण उंच डोंगरावर किंबहुना हवेतच आपली शिकार पकडताना कधी पाहिलं आहे का? सध्या शिकारीचा असाच एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होतो आहे (Snow leopard video). स्नो लेपर्ड म्हणजे हिमबिबट्याने बर्फाळ डोंगरात केलेल्या शिकारीचा भयंकर व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. पण वेगाने पळून नव्हे तर हवेत झेपावत त्याने शिकार केली आहे. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. शिकारीचा असा व्हिडीओ तुम्ही कधीच पहिला नसेल. व्हिडीओत पाहू शकता, बिबट्या बर्फाळ डोंगरातून वाऱ्याच्या वेगाने पळतो आहे. त्याच्या पुढे त्याची शिकार म्हणजे एक ब्लू शीप आहे. ब्लू शीप आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतो आहे. तो इतका पळतो की मागे जसा मृत्यू आहे, तसाच समोरही मृत्यूच होता, पण तो त्याला दिसला नाही. डोंगराच्या कडेवरून तो कोसळला. आता तरी बिबट्या त्याचा पाठलाग सोडेल असं वाटतं पण नाही बिबट्याने धक्काच दिला. हे वाचा - अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO बिबट्यानेही त्याच वेगाने डोंगराच्या कडेवरून उडी मारली.  हवेत झेपावत हवेतच त्याने आपला डाव साधला. हवेतच बिबट्याने ब्लू शीपला पकडलं. त्यानंतर दोघंही उंचावरून खाली धाडकन आदळतात. दोघंही बऱ्याच अंतरापर्यंत घसरत जातात. त्यावेळी कितीतरी अडथळेही येतात. वेगही इतका असतो की कदाचित बिबट्याच्या तावडीतून त्याची शिकार निसटली असावी असंच वाटतं. पण नाही बिबट्या दुसरा धक्का दिला. बिबट्याने आपल्या तावडीतील शिकार काही सोडली नाही. हे वाचा - व्हेलने बोटीला धक्का दिला आणि..., मृत्यूच्या तोंडात तरुणी; VIDEO पाहून भरेल धडकी आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Leopard, Snow, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या