मराठी बातम्या /बातम्या /Viral /कर्मचाऱ्यासाठी कंपनीने बर्थडे पार्टी ठेवली; त्यानेच बॉसविरोधात दाखल केला गुन्हा, कोर्टाने सुनावला अजब निकाल

कर्मचाऱ्यासाठी कंपनीने बर्थडे पार्टी ठेवली; त्यानेच बॉसविरोधात दाखल केला गुन्हा, कोर्टाने सुनावला अजब निकाल

कंपनीला सरप्राईज आणि अनवॉन्टेड पार्टी (Unwanted Birthday Party) यातील फरक समजला नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय कंपनीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली

कंपनीला सरप्राईज आणि अनवॉन्टेड पार्टी (Unwanted Birthday Party) यातील फरक समजला नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय कंपनीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली

कंपनीला सरप्राईज आणि अनवॉन्टेड पार्टी (Unwanted Birthday Party) यातील फरक समजला नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय कंपनीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली

नवी दिल्ली 18 एप्रिल : आजच्या युगात पार्टी हे एक साधन आहे ज्याचा उद्देश लोकांचा ताण दूर करणं, खाणं-पिणं आणि आनंद घेणं, हा आहे. हा मात्र पार्टी तोपर्यंतच चांगली असते, जोपर्यंत ती लोकांच्या इच्छेने होत असते. अन्यथा कोट्यवधी रुपयांची भरपाई द्यावी लागू शकते. असाच प्रकार ग्रॅव्हिटी डायग्नोस्टिक्स नावाच्या कंपनीच्या बाबतीत घडला. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी दिली आणि त्याला तिथेच पॅनिक अ‍ॅटॅक आला.

बॉर्डर ओलांडून दररोज भारतात यायचा बांगलादेशमधील मुलगा; पोलिसांना सांगितलेलं कारण जाणून व्हाल शॉक

विशेष बाब म्हणजे, कंपनीला सरप्राईज आणि अनवॉन्टेड पार्टी (Unwanted Birthday Party) यातील फरक समजला नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय कंपनीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली. इतर लोक ही पार्टी एन्जॉय करत असताना बर्थडे बॉयला मात्र पॅनिक अ‍ॅटॅक आला आणि इथून कंपनीचे वाईट दिवस सुरू झाले. त्या कर्मचाऱ्याच्या मेडिकल रिक्वेस्टकडे लक्ष न देणं कंपनीला महागात पडलं (Man awarded 3 Crore Over Birthday Party).

ही घटना अमेरिकेतील केंटकी येथे राहणाऱ्या केविन बर्लिंगसोबत घडली आहे. कंपनीने त्याला त्याच्या वाढदिवशी एक पार्टी आयोजित करण्यास सांगितलं, ज्याला केविनने स्पष्टपणे नकार दिला. कारण यामुळे त्याला तणाव आणि पॅनिक अ‍ॅटॅक येतो. मात्र कंपनीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक पार्टी आयोजित केली आणि केविनला पॅनिक अ‍ॅटॅक आला. यापेक्षा वाईट बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच्या सुपरवायझरने त्याला फटकारलं की त्याच्यामुळे लोकांच्या आनंदावर विरजन पडलं आणि तो लहान मुलीसारखं वागत होता. ऑक्‍टोबर 2018 पासून कंपनीत काम करणार्‍या केविनला काही दिवस कामावरूनही काढून टाकण्यात आलं.

बंद पडलेला TV सुरू करण्यासाठी भयंकर जुगाड; हातात काठी घेतली अन्..., VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक

या घटनेनंतर केविन बर्लिनने हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला. तक्रारीनुसार, केविनला पॅनिक अॅटॅक आल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. कंपनीने त्याचा पॅनिक अ‍ॅटॅक धोकादाक असल्याचं म्हटलं, परंतु त्यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नव्हता. दोन दिवसांच्या खटल्यानंतर न्यायालयाने बर्लिंगच्या बाजूने निर्णय दिला, त्याला भावनिक तणावासाठी $300,000 आणि वेतनाच्या तोट्यासाठी $150,000 भरपाई देण्यास सांगितलं गेलं. भारतीय चलनात ही रक्कम ३.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या या निर्णयाला कंपनीने पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे.

First published:

Tags: Birthday celebration, Party night