नवी दिल्ली 17 एप्रिल : जुगाड हा असा शब्द आहे ज्यात लोक असे अद्भुत पराक्रम दाखवतात जे सर्वांनाच थक्क करतात. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Jugad Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टीव्ही सुरू करण्यासाठी ज्या प्रकारचा जुगाड करत आहे, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. पण विशेष बाब म्हणजे व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसणार्या व्यक्तीचा जुगाड काम करतो आणि शेवटी जे काही घडतं, ते पाहून तुम्हीही अवाक व्हाल VIDEO: महिलेकडून भररस्त्यात फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं जबर मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अचानक एक व्यक्ती बंद टीव्हीवर काठीने मारू लागतो. काही वेळातच हा व्यक्ती प्रचंड वेगाने आणि वारंवार टीव्हीवर काठीने वार करू लागतो. हे पाहून आज तो रागाच्या भरात टीव्ही फोडूनच शांत बसेल असं वाटतं. मात्र असं काहीही होतं नाही.
हा व्यक्तीने काठीने टीव्हीवरती मारत असताना बराच वेळानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये दिसतं की थोड्याच वेळात हा टीव्ही अगदी व्यवस्थितपणे सुरू होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळत आहे. वाह! या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल इन्स्टाग्रामवर beautifulteach या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. जवळपास 6 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईकदेखील केलं आहे. तुम्हालाही या जुगाडचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.