नवी दिल्ली 04 जून : अनेकदा डिलिव्हरी कंपन्या आणि रेस्टॉरंट ऑर्डर देताना हे लक्षात ठेवायला विसरतात की ते डिलिव्हरी करणार असलेली ऑर्डर (Online Food Order) ग्राहकाने सांगितल्याप्रमाणे आहे की नाही. अशा परिस्थितीत अनेकदा मोठी चूक होते आणि चुकीची ऑर्डर दिली जाते. पण यावेळी एका व्यक्तीसोबत घडलेली घटना खूपच धक्कादायक आहे. त्याने दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली, पण याच्या आतमध्ये त्याला अशी गोष्ट दिसली, जे पाहून त्याला धक्काच बसला (Chicken Piece in Coffee). स्पर्म डोनेट करून बनला 15 मुलांचा बाप; पण महिलांपासून लपवलं स्वतःचं धक्कादायक सत्य, कोर्टात पोहोचलं प्रकरण सुमित सौरभ (@sumitsaurabh) नावाच्या व्यक्तीने अलीकडेच आपल्या ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये या धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. त्याने दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली, पण त्या कॉफीमध्ये जे काही सापडलं ते पाहून सुमितला राग आला आणि त्याने ट्विटरवर झोमॅटो आणि थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटच्या विरोधात आवाज उठवला.
Ordered coffee from @zomato , (@thirdwaveindia ) , this is too much .
— Sumit (@sumitsaurabh) June 3, 2022
I chicken piece in coffee !
Pathetic .
My association with you officially ended today . pic.twitter.com/UAhxPiVxqH
सुमितने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये चिकनचा तुकडा कॉफीच्या कपच्या शेजारी असलेल्या झाकणात ठेवलेला दिसत आहे. सुमितने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- “मी थर्डवेव्ह इंडिया नावाच्या रेस्टॉरंटमधून झोमॅटोच्या माध्यमातून कॉफी ऑर्डर केली होती, पण त्यांनी अगदी मर्यादाच ओलांडली. कॉफीमध्ये एक चिकन पीस आहे. Zomato सोबतचा माझा संबंध आज संपत आहे."
Ordered coffee from @zomato , (@thirdwaveindia ) , this is too much .
— Sumit (@sumitsaurabh) June 3, 2022
I chicken piece in coffee !
Pathetic .
My association with you officially ended today . pic.twitter.com/UAhxPiVxqH
यानंतर सुमितने आणखी एका ट्विटमध्ये सांगितलं की, झोमॅटोकडून अशी चूक झाल्यानंतर त्यांनी आणखी एक चूक केली. सुमितने आपल्या आणि झोमॅटो कस्टमर केअरमधील संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की आपली चूक लपवण्यासाठी झोमॅटोने त्या व्यक्तीला विनामूल्य प्रो मेंबरशिप ऑफर केली. या स्क्रीनशॉटसोबत सुमितने लिहिलं - “प्रिय झोमॅटो, अशा चुका केल्यावर तुम्ही प्रत्येकाला विकत घेऊ शकत नाही.” सुमितच्या स्क्रीनशॉटशी संबंधित एक मोठी गोष्ट म्हणजे त्याने आपल्या पत्नीसाठी कॉफी ऑर्डर केली होती जी शाकाहारी आहे. या गोष्टीमुळे त्याने यावर जास्त आक्षेप घेतला. महिलेनं ऑनलाईन मागवला जुना सोफा; सफाई करताना आतमध्ये सापडले 28 लाख रुपये, उचललं हे पाऊल सुमितने आणखी एका ट्विटमध्ये सांगितलं की, नवरात्रीदरम्यानही झोमॅटोने अशीच चूक केली होती. यावेळी त्याला व्हेज बिर्याणीऐवजी नॉनव्हेज बिर्याणी पाठवली होती. सुमितच्या या ट्विटनंतर रेस्टॉरंटनेही त्याच्या ट्विटवर कमेंट करून माफी मागितली, मात्र सुमितची नाराजी स्पष्ट दिसत होती.
So many of you are commenting as if I put chicken in my coffee .
— Sumit (@sumitsaurabh) June 3, 2022
I am really sorry and I pray you also get the same in your refreshing drinks 🥤
याशिवाय सुमितनेच यात मुद्दाम चिकनचा तुकडा टाकला असेल, असा आरोप काहींनी केला. यावरही त्याने उत्तर देत म्हटलं की ‘मी आशा करतो, की तुमच्या कॉफीमध्येही अशाचप्रकारे काहीतरी सापडावं’.