नवी दिल्ली 04 जून : जगभरात असे अनेक लोक आहेत जे स्पर्म डोनेट (Sperm Donor) करतात. याबाबत अशा अनेक विचित्र बातम्या समोर येतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. ब्रिटनमध्ये स्पर्म डोनेशनबाबत एक असंच प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. परिस्थिती अशी आहे की आता हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे, कारण या स्पर्म डोनरने त्या सर्व महिलांपासून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लपवली होती, जी आता उघड झाली आहे. 18 वर्षांपासून एकही बाळाचा जन्म नाही, गावातल्या ‘या’ बाहुल्या ठरल्या जागतिक आकर्षणाचं केंद्र जेम्स मॅकडोगल असं या ३७ वर्षीय ब्रिटिश रहिवाशाचं नाव आहे. स्पर्म डोनेट करून जेम्स आतापर्यंत 15 मुलांचा बाप बनला आहे. जेम्सबद्दल असं बोललं जात आहे की तो त्याचे स्पर्म फक्त लेस्बियन महिलांना दान करत असे. मात्र जेम्सने त्याच्या एका धोकादायक आजाराची (Serious Disease) बाब त्या सर्व महिलांपासून लपवून ठेवली होती. जेम्सला Fragile X Syndrome नावाचा आजार होता. त्यामुळे त्याच्या स्पर्मद्वारे जन्माला आलेल्या मुलांना लर्निंग डिसॅबिलिटी येण्याचा धोका असतो. लेस्बियन महिलांसाठी बनवलेल्या सोशल मीडिया पेजेसवर स्पर्म डोनरचा शोध घेतला जातो. त्याच पेजवर जेम्सने त्याची एक जाहिरात शेअर केली होती. मात्र त्याने यात आपल्या आजाराचा उल्लेख केला नव्हता. Shocking! मासेमारी करताना माशाने थेट व्यक्तीच्या तोंडातच घेतली उडी; गळ्यात अडकल्याने श्वास थांबला अन् मग… जेम्सचं प्रकरण आता कोर्टात पोहोचलं आहे. न्यायालयाने सांगितलं की, एक 25 वर्षीय तरुणी जेम्सच्या संपर्कात आली होती. जिने जेम्सच्या शुक्राणूपासून दोन मुलांना जन्म दिला. एक मुलगा तीन वर्षांचा तर दुसरा दोन वर्षांचा आहे. यामध्ये एका मुलाला नीट बोलता येत नाही, तर दुसऱ्याची अवस्था अशी आहे की त्याच्या मेंदूचा योग्य विकास झालेला नाही. कोर्ट पुढे म्हणालं की जेम्स स्वतः गोष्टी लक्षात ठेवण्यात असमर्थ आहे. त्यामुळे न्यायालयाने आता त्याला शुक्राणू दान करण्यापासून रोखलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.