जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलेनं ऑनलाईन मागवला जुना सोफा; सफाई करताना आतमध्ये सापडले 28 लाख रुपये, उचललं हे पाऊल

महिलेनं ऑनलाईन मागवला जुना सोफा; सफाई करताना आतमध्ये सापडले 28 लाख रुपये, उचललं हे पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिलेनं सांगितलं की, जेव्हा सोफा घराच्या आत आणला गेला तेव्हा मला खूप आनंद झाला. मात्र जेव्हा तिने सोफा साफ करायला सुरुवात केली तेव्हा तिने पाहिलं की कुशनच्या आत अनेक लिफाफे ठेवलेले होते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 जून : कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या विकी उमोडू नावाच्या महिलेला आपल्या घरासाठी फर्निचर खरेदी करायचं होतं. त्यामुळे तिने ऑनलाइन जाहिराती पाहायला सुरुवात केली. या दरम्यान तिला एक सोफा मोफत मिळाला. जेव्हा तिने हा सोफा घरी आणला तेव्हा तिनं पाहिलं की त्याच्या गादीमध्ये 36 हजार डॉलर्स भरलेले होते. हे पाहून महिलेला आश्चर्याता धक्का बसला (Woman Found Money in Sofa). Shocking! मासेमारी करताना माशाने थेट व्यक्तीच्या तोंडातच घेतली उडी; गळ्यात अडकल्याने श्वास थांबला अन् मग… उमोडूचं म्हणणं आहे की तिने लॉस एंजेलिसजवळील कोल्टन येथे घर खरेदी केलं आहे. घर पूर्णपणे रिकामं होतं आणि तिथे ठेवण्यासाठी काहीच वस्तू नव्हत्या. मात्र, वस्तू खरेदी करण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत तिला कमी खर्चात घर सजवायचं होतं. अशा परिस्थितीत महिलेनं घरासाठी फर्निचर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन जाहिराती पाहण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान एका कुटुंबाने तिला सोफा सेट मोफत देऊ केला. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. सुरुवातीला तिला ही मस्करी वाटली. मात्र, यानंतर महिलेला खरोखरच हा सोफा मोफत मिळाला. महिलेनं सांगितलं की, जेव्हा सोफा घराच्या आत आणला गेला तेव्हा मला खूप आनंद झाला. मात्र जेव्हा तिने सोफा साफ करायला सुरुवात केली तेव्हा तिने पाहिलं की कुशनच्या आत अनेक लिफाफे ठेवलेले होते, ज्यामध्ये हजारो डॉलर्स भरले होते. हे पाहून महिलेनं आपल्या मुलाला बोलावलं. त्यानंतर नोटांची मोजणी केली असता यात 36 हजार डॉलर (सुमारे 28 लाख रुपये) निघाले. हे आहे जगातलं सर्वांत श्रीमंत गाव, गावातल्या प्रत्येकाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल चकित मात्र, त्यांनी सोफ्याच्या खऱ्या मालकाला याबद्दल कळवून सर्व पैसे त्या कुटुंबाला परत केले. सर्व पैसे कुठून आले हे माहिती नसल्याचं या कुटुंबीयांनी सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी महिलेचे आभार मानले आणि 2,000 डॉलर तिला भेट म्हणून दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात