मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चालत्या रिक्षात घुसत तरुणीला जबरदस्ती KISS करून पळाला भामटा; विचित्र घटनेचा VIDEO VIRAL

चालत्या रिक्षात घुसत तरुणीला जबरदस्ती KISS करून पळाला भामटा; विचित्र घटनेचा VIDEO VIRAL

व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन महिला आणि एक लहान मुलगा रिक्षामध्ये बसून चालले आहेत. ट्राफीकमुळे रस्त्यावरील गाड्या अत्यंत धिम्या गतीनं पुढे सरकत आहेत. इतक्यात अचानक एक व्यक्ती या रिक्षामध्ये येतो

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 21 ऑगस्ट : पाकिस्तानात महिलेसोबत झालेल्या गैरवर्तनाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. महिलेसोबत झालेल्या छेडछाडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Pakistan Viral Video) होत आहे . व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका व्यक्तीनं रिक्षात बसून चाललेल्या दोन महिलांसोबत सर्वांसमोरच घाणेरडं कृत्य केलं. इतकंच नाही तर या व्यक्तीनं यातील एका महिलेच्या गालावर 'किस'ही केलं (Man Kissed Unknown Girl in Rickshaw) आणि यानंतर तो पळून गेला. व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन महिला आणि एक लहान मुलगा रिक्षामध्ये बसून चालले आहेत. ट्राफीकमुळे रस्त्यावरील गाड्या अत्यंत धिम्या गतीनं पुढे सरकत आहेत. इतक्यात अचानक एक व्यक्ती या रिक्षामध्ये येतो, यानंतर तो महिलेला किस करून तिथून पळून जातो. या महिलांना काही समजण्याआधीच तो तिथून पळ काढतो. यानंतर रिक्षामध्ये बसलेल्या तरुणी ओरडू लागतात. त्या खाली उतरण्याचा प्रयत्नही करतात, मात्र रस्त्यावर भरपूर गर्दी असल्यानं उतरू शकत नाहीत. Oh No! स्टंट करता करता धाडकन तोंडावर आपटला अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा लोक हातामध्ये पाकिस्तानचा ध्वज घेऊन उभा होते, यावरुन ही घटना 14 ऑगस्टची असल्याचा अंदाज लावला जात आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. VIDEO : आपसात भिडल्या विद्यार्थीनी; एकमेकींची लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई याआधीही पाकिस्तानाती एक व्हिडिओ समोर आला होता. यात गर्दीनं एका महिला टिकटॉकरला हवेत फेकून तिचे कपडे फाडल्याचं पाहायला मिळालं होतं. या घटनेनंतरही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. अशात आता पाकिस्तानातील हा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
First published:

Tags: Shocking viral video, Video Viral On Social Media

पुढील बातम्या