Home /News /viral /

बॉयफ्रेंडच्या आजोबांमुळेच गरोदर राहिली तरुणी; चुलत्यालाच मुलगा समजून सांभाळत राहिला तरुण

बॉयफ्रेंडच्या आजोबांमुळेच गरोदर राहिली तरुणी; चुलत्यालाच मुलगा समजून सांभाळत राहिला तरुण

टिकटॉक यूझर स्टॉक्सनं सांगितलं, की तो या धक्क्यातून अजून सावरलेला नाही. कारण, त्याला असं समजलं आहे, की त्याच्या गर्लफ्रेंडला झालेलं मुल हे त्याचं नसून त्याच्या आजोबांचं आहे.

    लंडन 20 जून : काही नाती इतकी किचकट असतात, की ती समजणं सहजासहजी आपल्याला शक्य होत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षांनी असं समजलं, की तो ज्याला आपला मुलगा समजत आहे, तो आपला मुलगा नसून चुलता आहे, तर? असं एक प्रकरण आता समोर आलं आहे. एक टिकटॉक यूझर स्टॉक्सनं सांगितलं, की तो या धक्क्यातून अजून सावरलेला नाही. कारण, त्याला असं समजलं आहे, की त्याच्या गर्लफ्रेंडला झालेलं मुल हे त्याचं नसून त्याच्या आजोबांचं आहे. नवरदेवानं एकाच मंडपात दोघींसोबत बांधली लग्नगाठ; भन्नाट आहे Love Story ही घटना यूनायटेड किंग्डमच्या लंडनमधील (London) आहे. द सननं दिलेल्या रिपोर्टनुसार, हा टिकटॉक (TikTok) यूजर आतापर्यंत ज्याला आपलं मुल समजत होता, तो नात्यानं त्याचा चुलता लागतो. ही बाब समजताच स्टॉक्सला मोठा धक्का बसला. त्यानं सांगितलं, की माझ्या गर्लफ्रेंडनं मला धोका दिला आहे. जेव्हा आम्ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये माझ्या घरी राहत होतो, तेव्हा तिनं माझ्याच आजोबांसोबत संबंध ठेवले आणि मला या गोष्टीची भनकही लागू दिली नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, की ती माझ्यासोबत असं काही करेल. माझ्या आजोबांनीही स्वतःच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ते माझे आजोबा असल्यानं मला कधीही त्यांच्यावर संशय आला नाही. VIDEO: एकटेपाण दूर करण्यासाठी सिंगल तरुणानं अवलंबला भलताच पर्याय; लोक म्हणाले... टिकटॉक यूजरनं एका व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत आपल्या फॉलोअर्सला माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एका यूजरनं स्टॉक्सला सहानुभूती देत म्हटलं आहे, की तुझ्याबद्दल ऐकून अत्यंत दुःख झालं. मला माहिती आहे, तुला खूप वाईट वाटत असेल. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी स्वतःला थोडा वेळ दे. तुझ्यासाठी जगात दुसरं कोणीतरी नक्की बनलं असेल. तर, दुसऱ्या एकानं लिहिलं, की तू मनाचा मोठेपणा दाखवून या मुलाचा सांभाळ करायला हवा. त्याला आधीप्रमाणेच प्रेम दे. तुझं त्याच्यासोबतचं नातं बदललं असलं तरीही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: London, Viral news

    पुढील बातम्या