मराठी बातम्या /बातम्या /Viral /Dating Website वरील मुलींचे प्रोफाईल पाहून भडकला युवक; कंपनीविरोधात दाखल केला गुन्हा

Dating Website वरील मुलींचे प्रोफाईल पाहून भडकला युवक; कंपनीविरोधात दाखल केला गुन्हा

इयान क्रॉसला दिसलं की या डेटिंग साईटवर 18-35 या वयोगटातील केवळ पाच महिलांचे प्रोफाईल होते. हे पाहून तो चिडला. त्यानं कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

इयान क्रॉसला दिसलं की या डेटिंग साईटवर 18-35 या वयोगटातील केवळ पाच महिलांचे प्रोफाईल होते. हे पाहून तो चिडला. त्यानं कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

इयान क्रॉसला दिसलं की या डेटिंग साईटवर 18-35 या वयोगटातील केवळ पाच महिलांचे प्रोफाईल होते. हे पाहून तो चिडला. त्यानं कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

वॉशिंग्टन 27 ऑक्टोबर : एका व्यक्तीनं डेटिंग वेबसाईटविरोधात तक्रार दाखल केली आहे (Complaint Against Dating Website). अमेरिकेतील (America) या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, की डेटिंग साईटवर पुरेशा मुलींचे प्रोफाईल (Girls Profile on Dating Website) नाहीत. साईट त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे त्याने कंपनीविरोधात केस दाखल केली आहे. व्यक्तीच्या या वागण्याने कंपनीही हैराण आहे. याचं काय उत्तर द्यावं, हे कंपनीलाही समजत नाहीये.

भलताच खटाटोप! चोरानं लढवलेली शक्कल पाहून चक्रावून जाल; Viral होतोय VIDEO

ब्रिटिश वेबसाईट ‘UNILAD’ च्या वृत्तानुसार, 'The Denver Dating Co.' एक डेटिंग वेबसाईट चालवते. यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही रक्कम ठरवण्यात आली आहे. यानंतर ग्राहक आपल्या आवडीनुसार पार्टनर शोधून त्याच्यासोबत बोलू शकतो. 29 वर्षीय इयान क्रॉस (Ian Cross) यानेही साईटची मेंबरशिप घेतली. त्याने यासाठी 7,06,056 रुपये खर्च केले. मात्र, त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

इयान क्रॉसला दिसलं की या डेटिंग साईटवर 18-35 या वयोगटातील केवळ पाच महिलांचे प्रोफाईल होते. हे पाहून तो चिडला. त्यानं कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. इयानला आपल्या वयाच्या सिंगल महिलेची अपेक्षा होती. त्याला असं सांगितलं गेलं की साईटवर त्याला आवडतील अशा अनेक महिलांचे प्रोफाईल उपलब्ध आहेत. यानंतर इयाननं वेबसाईटचं सब्सक्रिप्शन घेतलं. मात्र, त्याचा अपेक्षाभंग झाला.

डायटिंग न करता फक्त FB आणि Instagram डिलीट करून महिलेनं घटवलं 31 किलो वजन

क्रॉसच्या वकिलांचं असं म्हणणं आहे, की वेबसाईटला या समस्येबद्दल सांगितलं आणि पैसे परत मागितले मात्र काही काळानंतर वेबसाईटनं उत्तर देणंच बंद केलं. अशाच कपंनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. क्रॉसने या वेबसाईटवर खोटी आणि फसवणूक करणारी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत म्हटलं गेलं, की कंपनीनं आपल्या वेबसाईटचे फेक रिव्ह्यूव तयार केले आहेत. याच्याच माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे.

First published:

Tags: Dating app, Online dating