• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं भलतंच महागात; पालकांनी मागितली 7 कोटी रुपयांची भरपाई

विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं भलतंच महागात; पालकांनी मागितली 7 कोटी रुपयांची भरपाई

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

एका शिक्षिकेनं एका विद्यार्थीनीच्या आई-वडिलांच्या परवानगीशिवायच तिचे केस कापले (Hair Cut). जेव्हा पालकांनी मुलीचे केस पाहिले तेव्हा त्यांना राग अनावर झाला.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 सप्टेंबर : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एक शिक्षिकेनं एका विद्यार्थीनीच्या आई-वडिलांच्या परवानगीशिवायच तिचे केस कापले (Hair Cut). जेव्हा पालकांनी मुलीचे केस पाहिले तेव्हा त्यांना राग अनावर झाला. बहुदा आई-वडील शाळेनं घेतलेल्या कोणत्या निर्णयाला फार विरोध करत नाहीत. कारण, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी या मुलांच्या चांगल्यासाठीच असतात. मात्र, एखाद्या शाळेनं असं काही केल्यास पालकही शांत राहणार नाहीत हे नक्की. त्यामुळे, या मुलीच्या पालकांनी कठोर पाऊल उचललं आणि हे प्रकरण आता थेट कोर्टात (Court) पोहोचलं आहे. पृथ्वीवरची अशी जागा जिकडे पायलट विमान न्यायला घाबरतात, खूपच भीतीदायक असतो अनुभव अमेरिकेच्या मिशिगन (Michigan) येथे राहणारी 7 वर्षी जर्नी याच वर्षी मार्च महिन्यात एक दिवस शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी पाहिलं, की कोणीतरी एका बाजूनं तिचे केस कापले होते (Teacher Cut Student's Hair) . जर्नीने आपल्या वडिलांना सांगितलं, की शाळेतील एका मुलीनं स्कूल बसमध्ये तिचे केस कापले. यानंतर तिच्या वडिलांनी याबाबत मुख्याध्यापकाकडे तक्रार केली. तिच्या वडिलांनी जर्नीचे केस व्यवस्थित कापण्यासाठी तिला सलूनमध्ये नेलं आणि तिचे केस व्यवस्थित केले. मात्र, दोन दिवसांनंतर जर्नी जेव्हा घरी परतली तेव्हा तिचे दुसऱ्या बाजूचे केसही कापले गेलेले होते. तिच्या वडिलांनी हे पाहून तिला विचारलं की तू पुन्हा आपल्या मैत्रिणीला हे का करू दिलं, तेव्हा तिनं सांगितलं की हे यावेळी मैत्रिणीनं नाही तर शिक्षिकेनं केलं आहे. लाल लाईट पेटताच हवेत उडाला तरुण; मॉडेलच्या डान्सनंतर सिग्नलवरील नवा VIDEO हे ऐकून मुलीच्या वडिलांना प्रचंड राग आला. जिमी यांनी असोसिएशन प्रेससोबत बोलताना सांगितलं, की जर्नीच्या शिक्षिकेनं रंगभेदामुळे तिच्यासोबत हे कृत्य केलं असावं. यावेळी जिमीनं ही गोष्ट अशीच सोडून दिली नाही. त्यांनी स्कूल डिस्ट्रिक्ट, लायब्रेरियन आणि शिक्षिकेच्या असिस्टंटवर 7 कोटीहून अधिक रुपयांची केस दाखल केली. जिमीनं शाळेवर संविधानिक अधिकारांचं उल्लंघन, वांशिक भेदभाव, कथित वांशिक धमकी, आणि भावनिक त्रास देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे शाळेने या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन केली होती ज्यात असे आढळून आले की शिक्षिकेने चांगल्या हेतूनं मुलीचे केस कापले. शाळेच्या मंडळाने स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी सांगितले आहे की ही घटना कोणत्याही प्रकारच्या वांशिक भेदभावाची घटना नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: