मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पृथ्वीवरची अशी जागा जिकडे पायलट विमान न्यायला घाबरतात, खूपच भीतीदायक असतो अनुभव

पृथ्वीवरची अशी जागा जिकडे पायलट विमान न्यायला घाबरतात, खूपच भीतीदायक असतो अनुभव

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

आपण पाहतो की विमानातील खिडक्या (Why aeroplane’s windows are round) या नेहमी गोल असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

जगातील सर्वांत अवघड कामांपैकी एक म्हणजे पायलट (Pilot) होणं. शेकडो लोकांच्या प्राणांची जबाबदारी वैमानिकांच्या हातात असते. त्यामुळे इतरांसाठी विमानात बसणं हा रोमांचक अनुभव असला, तरी वैमानिकांसाठी प्रत्येक वेळी हे एक चॅलेंज असतं.

मुंबई, 19 सप्टेंबर : जगातील सर्वांत अवघड कामांपैकी एक म्हणजे पायलट होणं. शेकडो लोकांच्या प्राणांची जबाबदारी वैमानिकांच्या हातात असते. त्यामुळे इतरांसाठी विमानात बसणं हा रोमांचक अनुभव असला, तरी वैमानिकांसाठी प्रत्येक वेळी हे एक चॅलेंज असतं. तसं तर पायलट होण्यासाठी अनेकप्रकारे प्रशिक्षण (Pilot training) घ्यावं लागतं. त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती असेल तरीही वैमानिक त्यावर मात करू शकतात. मात्र, जगात असं एक ठिकाण आहे, ज्याच्यावर आकाशातून विमान घेऊन जाण्यासाठी निष्णात वैमानिकही कचरतात.

हे ठिकाण तसं भारतापासून अगदीच जवळ आहे. भारत-चीन सीमेवरील तिबेट (Tibet) या छोट्याशा देशाबाबत आम्ही बोलत आहोत. तसं तर हा छोटासा देश अतिशय सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. इथल्या डोंगर दऱ्या कित्येक पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, या डोंगरांमुळेच (Why pilots avoid tibet) या ठिकाणी विमान प्रवास करणं कित्येक वैमानिकांना भीतीदायक वाटतं. यामुळेच आशिया खंडात प्रवास करणारी कित्येक विमाने ही तिबेटच्या हवाई हद्दीतून (Why everyone avoid flying over tibet) न जाता, बाजूने वळून जातात.

तिबेट देश हा जगातील सर्वात उंच पठारावर वसलेला आहे. या देशाला जगाचं छत असंही म्हणतात. याला कारण म्हणजे तिथे असलेले कित्येक उंच डोंगर. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट आणि के२ ही दोन्ही पर्वत शिखरं या ठिकाणी आहेत. पण विमान तर या सगळ्याच्या वरुन आरामात उडू शकतं? मग वैमानिक (Pilots avoid this part of world) हा भाग का टाळतात?

याला कारण आहे, विमानांची रचना. आजकाल सर्व विमानांमध्ये दोन इंजिन असतात. यातील एक इंजिन हे मुख्य असतं, तर दुसरं सेकंडरी. मुख्य इंजिनमध्ये (Secondary engine) बिघाड झाल्यास, लँड होईपर्यंत काही प्रमाणात ते विमान उडत रहावं, यासाठी सेकंडरी इंजिन बसवण्यात आलेलं असतं. मात्र, या सेकंडरी इंजिनची क्षमता तेवढी जास्त नसल्यामुळे, विमान अधिक उंचीवर उडू शकत नाही. अशात जर ते डोंगराळ भागात असेल, तर या डोंगरांवर क्रॅश होण्याचा धोका अधिक असतो.

याला दुसरं कारण म्हणजे, क्लीन एअर (Clean air turbulence) टर्ब्युलन्स. साधारणपणे जेव्हा आकाशात हवेचा पॅटर्न बदलतो, तेव्हा विमान डगमगू लागतं. याला टर्ब्यूलन्स म्हणतात. इतर ठिकाणी विमान उडवताना वैमानिक आपल्या केबिनमधूनच टर्ब्यूलन्स येणार असल्याचे ओळखून आवश्यक ती काळजी बाळगू शकतात. मात्र, तिबेटमध्ये क्लीन एअर टर्ब्यूलन्स असल्यामुळे, वैमानिकाला त्याचा अंदाज येत नाही.

कित्येक वेळा मोठी अडचण आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं. अशा वेळी इतर ठिकाणी लँडिंग करणं सोपं आहे, मात्र तिबेटच्या डोंगराळ (Most dangerous part to fly plane) भागांमध्ये नाही. जवळच भूतान देशाचे विमानतळ आहे. पण हे विमानतळ अशा ठिकाणी आहे, जिथे लँडिंग करण्यासाठी भल्या भल्या वैमानिकांना प्रयत्नांची शर्थ करावी लागते.

अशा विविध कारणांमुळे, वैमानिक तिबेटवरुन जाणं टाळतात. त्यापेक्षा कित्येक लोक वळून दुसऱ्या लांबच्या पण अधिक सुरक्षित मार्गांचा पर्याय अवलंबतात.

First published:

Tags: Airplane