Home /News /viral /

पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO

पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घरामध्ये उभा असल्याचं दिसतं. अचानक दरवाज्यामधून एक अस्वल आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागतं.

    नवी दिल्ली 24 जानेवारी : माणूस जेव्हा प्राण्यांवर प्रेम करू लागतो, तेव्हा तो आपल्या पाळीव प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतो. माणूस आपल्या पाळीव प्राण्यांची अगदी मनापासून काळजी घेतो आणि त्यांच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकायलाही तयार होतो. कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र सध्या अमेरिकेतील अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात हा व्यक्ती आपल्या पाळीव श्वानाचा जीव वाचवण्यासाठी थेट अस्वलासोबत भिडण्यासाठीही तयार झाला (Man Fights with Bear to Save Pet Dog). मृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घरामध्ये उभा असल्याचं दिसतं. अचानक दरवाज्यामधून एक अस्वल आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागतं. काळ्या रंगाचं हे अस्वल या व्यक्तीच्या घरात असलेल्या दोन छोट्या पाळीव श्वानांना शिकार बनवण्याच्या उद्देशाने घरात शिरलेलं आहे. मात्र, अस्वल श्वानांवर हल्ला करत असल्याचं पाहताच हा व्यक्ती श्वानांना मागे करतो आणि स्वतःच अस्वलासोबत भिडतो (Bear Attack Video). व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, की अस्वल या व्यक्तीवर हल्ला करतं मात्र तरीही आपल्या श्वानांचा जीव वाचवण्यासाठी हा व्यक्ती अस्वलासोबत संपूर्ण ताकदीसह लढतो. हा व्यक्ती अस्वलाला बाहेर ढकलतो आणि घरातील बेंचवर एक खुर्ची लावतो, जेणेकरून अस्वल आतमध्ये येणार नाही. डब्ल्यू एक टीव्हीच्या वृत्तानुसार, डेटोना बीचच्या जवळ राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव वॉल्टर हिकॉक्स असं आहे. 'एक चुम्मा' गाण्यावर लग्नात डान्स करीत होता तरुण; अचानक खाली कोसळला, उठलाच नाही! चॅनेलसोबत बोलताना या व्यक्तीने सांगितलं की जेव्हा अस्वलाने हल्ला केला, तेव्हा त्याने इतर काहीही विचार केला नाही आणि तो थेट अस्वलासोबत भिडला. त्याला असं वाटलं, की अस्वल घराच्या आतमध्ये गेल्यास त्याच्या पाळीव श्वानांवर तसंच त्याच्या पत्नीवर हल्ला करू शकतं. या व्यक्तीने सांगितलं की तो श्वानांना आणि अस्वलाला एकमेकांच्या नजरेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता, कारण श्वानांना पाहून अस्वल आणखीच भडकत असल्याचं दिसत होतं. सोशल मीडियावर अनेकांनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे, की बरं झालं हे अस्वल लहान होतं, जर ते मोठं असतं तर परिस्थिती आणखीच अवघड झाली असती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack, Shocking video viral

    पुढील बातम्या