Home /News /viral /

मृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला मृतदेह

मृत्यूचा Live Video; चालत्या बाईकवर सोडला जीव; रात्रभर रस्त्यावरच पडून राहिला मृतदेह

मृत्यूचा live Video समोर आला आहे. हा पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

  भोपाळ, 23 जानेवारी : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) आलीराजपुरमध्ये चालत्या बाईकवर तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात 45 वर्षीय एक व्यक्ती रस्त्याशेजारी बाईकसोबत खाली पडतो आणि अचानक त्याचा मृत्यू होता. मृत्यू लाइव्ह व्हिडीओ (death Live Video) समोर आला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे रात्रभर त्याचा मृतदेह रस्त्यावरच पडला होता. ही घटना शनिवारी रात्री उशिरा आजीराजपुरच्या जोबट भागात घडली. (Live Video the death) CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती रस्त्याशेजारी बाइक थांबवताना दिसत आहे. यानंतर तो गाडी पुढे घेता. मात्र यादरम्यान अचानक रस्त्याशेजारील गटारात पडतो. आजूबाजूचे लोक त्याला उचलण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो उठत नव्हता. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, काही लोक त्याला उचलण्यासाठी आले होते. मात्र त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला तेथेच ठेवलं. बाईक स्वाराचा मृतदेह संपूर्ण रात्रं रस्त्याच्या किनाऱ्यावर पडून होता. रविवारी सकाळी जवळून जाणाऱ्या लोकांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. हे ही वाचा-लातूर: भरदिवसा पाडला रक्ताचा सडा; महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याचे वार,पाहा VIDEO पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण येईल समोर... जोबट पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोहोचवला. या व्यक्तीचं नाव हुसैन असून (45) धरमराय येथील राहणारा आहे.

  पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कळवलं आहे. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत नेमकं कारण कळेल.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Death, Shocking video viral

  पुढील बातम्या