बैतूल, 23 जानेवारी : मध्य प्रदेशातील बैतूलमधून (Madhya pradesh baitul shocking Video) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ (shocking Video) पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हा मृत्यूचा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. नातेवाईकाच्या लग्नात डान्स (Heart attack while dancing) करीत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलं की तरुण मस्ती करतोय. मात्र त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नसल्याचं पाहून लोक घाबरले. आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
कुटुंबीय आणि मित्रांना वाटलं नाटकं करतोय तरुण...
रिसेप्शन सुरू असताना सर्व नातेवाईक डान्स करीत होते. यानंतर अनंतदेखील स्टेजवर पोहोचला आणि 'एक चुम्मा तो मुझको उधार दे दे' या गाण्यावर डान्स करू लागला. तो खूप एन्जॉय करीत होता. अचानक तो नाचता नाचता खाली कोसळला. कुटुंबीय आणि मित्रमंडळींना वाटलं की तो नाटक करतोय.
हे ही वाचा-शहरात दहशत असणाऱ्या 'लेडी डॉन'च्या प्रेमात 2 गँगस्टर झाले 'जानी दुश्मन'
काही वेळानंतर त्यांना संशय आला. सर्वजण त्याला जागं करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो उठलाच नाही. शेवटी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याने यावेळी दारू प्यायल्याचं सांगितलं जात आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू..
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृत्यू हृदयविकाऱ्याच्या झटक्याने झाली. अशावेळी अचानक हृदय काम करणं बंद होतं. आणि काही क्षणात व्यक्तीचा मृत्यू होतो. या घटनेनंतर विवाहाच्या घरात शोककळा पसरली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.