ब्राझिलिया, 17 ऑगस्ट : कुत्रा (Dog) आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी (Dog owner) आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. मालकाच्या जीवासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या कुत्र्यांचे (Owner saved dog life) व्हिडीओ सोशल मीडियावरही (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण आता एका कुत्र्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मालकाचा व्हिडीओ समोर आला आहे (Anaconda Attacks on Dog) आपल्या कुत्र्यासाठी मालक थेट अॅनाकोंडाशी भिडला आहे (Owner saved dog from anaconda).
अॅनाकोंडाशी टक्कर देत आपल्या कुत्र्याला मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या मालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ब्राझीलच्या (Brazil) साओ पाओलोतील ही थरारक घटना आहे.
कार्लिनहोस ब्रासिल (Carlinhos Brasil) नावाच्या तरुणाचा लायन नावाचा कुत्रा (Lion) तलावाजवळ पाणी पिण्यासाठी गेला होता. पाणी पित असताना त्याच्यावर अॅनाकोंडाने हल्ला केला, त्यावेळी तो मोठमोठ्याने ओरडू लागला. आपल्या कुत्र्याचा आवाज ऐकून कार्लिनहोस तिथं धावत आला. एका अॅनाकोंडाने आपल्या कुत्र्याला विळख्यात घेतलं आहे, हे त्याने पाहिलं आण मागचापुढचा कोणताही विचार न करता कुत्र्याला सोडवण्यासाठी त्याने अॅनाकोंडाला टक्कर दिली. डेली स्टारने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हे वाचा - ...अन् जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
अॅनाकोंडाच्या जबड्यातून त्याची शिकार काढून घेणं म्हणजे सोपं नाही. त्याच्याजवळ जाण्याचीही कुणाची डेअरिंग होणार नाही. पण आपल्या कुत्र्याला अॅनाकोंडाच्या तोंडात तडफडताना पाहून मालकाला राहवलं नाही. त्याने आपल्या जीवाची पर्वा न घेता कुत्र्यासाठी अॅनालकोंडाशी लढाई सुरू केली. एका तरुणाने त्याची शेपटी धरली आहे, तर ब्रासिल त्याला फक्त एका काठीने मारताना दिसतो आहे. तसंच कुत्र्याभोवतीचा विळखा तो आपल्या हातानेच सोडवतो आहे. त्यातून कुत्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
जवळपास 15 फूट लांबीचा हा साप आहे. ज्याच्या विळख्यात कुत्रा आहे. तब्बल 40 मिनिटं ही झुंज अशीच सुरू होती. यादरम्यान कुत्रा बेशुद्धही झाला होता. पण कसंबसं करून ब्रासिलने आपल्या कुत्र्याची अॅनाकोंडाच्या तावडीतून सुटका केलीच.
हे वाचा - VIDEO - वडिलांनीच चिमुकल्याला हवेत उडवलं; पाहताच चुकला आईच्या हृदयाचा ठोका
कुत्र्याचा जीव वाचवल्यानंतर ब्रासिलने सांगितलं, हे खूप खरतनाक होतं. अॅनाकोंडा भुकेला होता आणि माझ्याकडे फक्त एक काठी होती. त्याच्या जबड्यातून त्याची शिकार खेचून घेणं भयंकर होतं. पण नशीबाने मला साथ दिली आणि आता माझा कुत्रा सुरक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Owner of dog, Snake, Snake video, Viral, Viral videos