• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - वडिलांनीच चिमुकल्याला हवेत उडवलं; पाहताच चुकला आईच्या हृदयाचा ठोका

VIDEO - वडिलांनीच चिमुकल्याला हवेत उडवलं; पाहताच चुकला आईच्या हृदयाचा ठोका

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

वडिलांनी चिमुकल्यासोबत असं काही केलं की...

 • Share this:
  मुंबई, 17 ऑगस्ट : मुलांसोबत (Baby) खेळता खेळता आपण अनेकदा असं काहीतरी करतो की ज्यामुळे मुलांच्या जीवाला (Baby video) धोका पोहोचू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात वडिलांनी मजेमजेत आपल्या मुलाला (Children) हवेत उडवलं. मुलाच्या आईलाही ते पाहून धक्का बसला (Shocking video). एका बापलेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात वडील मुलासोबत खेळताना दिसत आहेत. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहून मुलाच्या आईप्रमाणे आपल्याही हृदयाचा ठोका चुकेल.
  View this post on Instagram

  A post shared by Baby world (@babyworld7860)

  व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला एक महिला दरवाजा उघडते. रूममध्ये वडील आपल्या मुलासोबत खेळत आहेत. वडील  बेडवर झोपले आहेत आणि त्यांनी आपले दोन्ही पाय वर करून त्यावर आपल्या मुलाला ठेवलं आहे. मुलाला न पकडताच त्यांनी आपल्या पायावर तोललं आहे. मुलाची आई अचानक रूममध्ये येते आणि ते दृश्य पाहून ओरडतेच. तेव्हा वडील लगेच आपले पाय खाली घेतात आणि मुलाला बाजूला ठेवतात.  जर वडीलांच्या पायाचा तोल गेला असता किंवा मुलगा थोडा जरी हलला असता आणि तो बेडऐवजी जमिनीवर पडला असता, तर त्याला दुखापत होण्याची शक्यता होती. पण त्याची आई वेळेत आल्याने सुदैवाने तसं काही झालं नाही. हे वाचा - अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशाच एक वडिलांनी आपल्या मुलीला फुगे बांधून हवेत सोडल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला आपल्या बाळाला हवेत उडताना पाहून खूप घाबरते. बाळाला वाचवण्यासाठी महिला अगदी वेगात बाळाकडे धाव घेते. मात्र, जेव्हा महिलेला आपलं बाळ हवेत का उडतं आहे याचं कारण समजलं तेव्हा ती थक्क झाली. कारण बाळाच्या कमरेला फुगे बांधून या चिमुकलीच्या वडिलांनी तिला हवेत सोडलं होतं. मात्र, आपल्या दोन्ही हातांनी तिला पकडलंही होतं. या बाळाच्या वडिलांनी मस्करी म्हणून हे सगळं केलं होतं आणि काहीच वेळाच महिलेच्याही हे लक्षात आलं. हे वाचा - Shocking! धड गायब, मध्यरात्री पळताना दिसले फक्त 2 पाय; Video पाहून फुटेल घाम Mack & Becky Comedy नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काहींच्या हा व्हिडिओ पसंतीस उतरला आहे तर काहींनी ही मस्करी महागात पडू शकते, असं म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: