वॉशिंग्टन, 31 जानेवारी : काही लोक असे असतात जे समोर एखाद्या माणसाला तडफडताना पाहूनही त्याच्या मदतीसाठी जात नाही. तर काही लोक असे असतात जे अगदी मुक्या जीवाला वाचवण्यासाठीही धडपडताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने एका कुत्र्याला (Dog video) मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आहे (Man gives CPR to dog) . हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Emotional video). व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक कुत्रा बेशुद्धावस्थेत पडला आहे. कुत्र्यामध्ये काहीच हालचात दिसत नाही आहे. त्याचवेळी ही व्यक्ती त्याच्या छातीवर आपल्या दोन्ही हातांनी दाब देताना दिसते. त्यानंतर कुत्र्याच्या तोंडात तोंड घालून आपल्या श्वास म्हणजे ऑक्सिजनही त्या कुत्र्याला देते. त्यानंतर पुन्हा छातीवर दाब देत त्या कुत्र्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. जवळ जवळ हा कुत्रा मृत्यूच्या दारातच पोहोचला होता. पण काय चमत्कार. अगदी मरणावस्थेत पडलेल्या कुत्र्याच्या शरीराची हालचाल होते. हे वाचा - हजारो फूट उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण आणि…; धडकी भरवणारा LIVE VIDEO कुत्र्यामध्ये जीव आल्याचं पाहून त्याला वाचवणाऱ्या व्यक्तीलाही आनंद होतो. ती त्या कुत्र्याला पूर्णपणे शुद्धीवर येण्यासाठी प्रोत्साहीत करते आणि काही वेळातच तो कुत्रा शुद्धीवर येऊन आपल्या पायांवर उभा राहतो आणि ज्या व्यक्तीने त्याचा मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं त्या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरत जणू काही त्याचे आभारच मानतो आहे, असं दिसतं.
This man was out for a walk when he noticed a dog had collapsed on the sidewalk. He ran up, performed CPR, and saved the dog's life.#Humanity ❤️🐶 pic.twitter.com/tCKkyzKwNe
— Goodable (@Goodable) January 29, 2022
कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिल्समधील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. Goodable नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही व्यक्ती फिरण्यासाठी बाहेर पडली होती. तेव्हा फूटपाथवर त्या व्यक्तीला एक कुत्रा बेशुद्ध पडल्याचा दिसला आणि त्या व्यक्तीने सीपीआर देत त्याचा जीव वाचवला. अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. हे वाचा - जिगरबाज कर्मचाऱ्याने आग विझवली, वसईच्या पेट्रोल पंपावर मोठा अनर्थ टळला या व्यक्तीने आपण यूट्युबवरून सीपीआरची प्रक्रिया शिकल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याने पहिल्यांदा या कुत्र्यालाच सीपीआर दिल्याचंही सांगितलं.