मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नात तरुणाने नवरी-नवरदेवाच्या अंगावरच मारली उडी; पुढं जे केलं ते पाहून व्हाल हैराण...VIDEO

लग्नात तरुणाने नवरी-नवरदेवाच्या अंगावरच मारली उडी; पुढं जे केलं ते पाहून व्हाल हैराण...VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसलेले असतात आणि त्यानंतर एक विधी पार पाडला जातो. ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची चादर पकडली जाते

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसलेले असतात आणि त्यानंतर एक विधी पार पाडला जातो. ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची चादर पकडली जाते

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसलेले असतात आणि त्यानंतर एक विधी पार पाडला जातो. ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची चादर पकडली जाते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 17 जानेवारी : लग्नात अनेक वेळा अशा काही अजब घटना घडतात, ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. नवरी आणि नवरदेव मंडपात बसलेले असताना काही विधी किंवा इतर गोष्टी पूर्ण करण्यासाठी लोक असं काहीतरी करतात, की सगळेच थक्क होतात. लग्नात घडलेल्या अजब गोष्टी अनेकदा कॅमेऱ्यात कैदही होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर टीकाही केली आहे.

लोडेड गनसोबत खेळत होता चिमुकला, पुढे असं काही झालं की पोलिसांनी वडिलांनाच केली अटक..VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसलेले असतात आणि त्यानंतर एक विधी पार पाडला जातो. ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची चादर पकडली जाते, परंतु यादरम्यान अशी काही घटना घडते की सगळेच हैराण होतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये वधू-वर मंडपात बसलेले दिसत आहेत. या दरम्यान, एक विधी केला जातो, ज्यामध्ये वधू आणि वराच्या बाजूला दोन लोक एक पांढरी चादर घेऊन उभा आहेत. यात तांदूळ टाकले जातात आणि ते तीन वेळा वर फेकतात. तिसर्‍यांदा तांदूळ हवेत फेकताच त्यांनी ती चादर दोन्ही बाजूंनी ओढायला सुरुवात केली.

या गोंधळात डावीकडील व्यक्ती चादरीसह वधू आणि वराच्या अंगावर पडला. यात वधू-वर पूर्णपणे जमिनीवर पडलेले दिसले. तरीही ही रस्सीखेच दोन्ही बाजूंनी चालूच राहिली आणि बराच वेळ हे लोक त्यातच मग्न राहिले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या सगळ्यात एक युवक नवरी आणि नवरदेवाच्या अंगावर पडला, मात्र तरीही त्याला काहीच फरक पडला नाही आणि त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. नवरी नवरदेव बराच वेळ तसेच जमिनीवर पडून राहिले.

हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना थक्क करत आहे. इन्स्टाग्रामवर neptiktok नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 3 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यातील काही कमेंट अतिशय मजेशीर आहेत.

First published:
top videos

    Tags: Video Viral On Social Media, Wedding video