जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लोडेड गनसोबत खेळत होता चिमुकला, पुढे असं काही झालं की पोलिसांनी वडिलांनाच केली अटक..VIDEO

लोडेड गनसोबत खेळत होता चिमुकला, पुढे असं काही झालं की पोलिसांनी वडिलांनाच केली अटक..VIDEO

लोडेड गनसोबत खेळत होता चिमुकला, पुढे असं काही झालं की पोलिसांनी वडिलांनाच केली अटक..VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डायपर घातलेलं एक मूल बंदुकीशी कसं खेळत आहे. कधी तो शिडीखाली लपून फिल्मी स्टाईलमध्ये गोळी झाडण्याचा सराव करतो, तर कधी तो बंदूक हवेत फिरवू लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 जानेवारी : लहान मुलांची खूप काळजी घेण्याची आणि त्यांच्यावर भरपूर लक्ष देण्याची गरज असते. ते घरात असले तरी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण ते कधी काय करतील, हे सांगता येत नाही. विशेषत: जर तुमच्या घरात बंदूक किंवा इतर काही शस्त्र असतील तर ती लहान मुलांपासून दूर ठेवणंच चांगलं, कारण लहान मुलांना हे किती धोकादायक आहे हे माहिती नसतं. हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO काही महिन्यांपूर्वीच एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यात एका अवघ्या 2 वर्षाच्या मुलाने लोडेड बंदुकीसोबत खेळताना चुकून वडिलांवर गोळी झाडली होती. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो हैराण करणारा आहे.

जाहिरात

या व्हिडिओमध्ये मूल कोणावरही गोळी झाडत नसलं तरी तो लोडेड बंदुकीने खेळताना दिसत आहे. मुलाने गोळी झाडली नाही ही चांगली बाब आहे आणि तिथे इतर कोणी नव्हतंही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डायपर घातलेलं एक मूल बंदुकीशी कसं खेळत आहे. कधी तो शिडीखाली लपून फिल्मी स्टाईलमध्ये गोळी झाडण्याचा सराव करतो, तर कधी तो बंदूक हवेत फिरवू लागतो. मात्र नंतर तो घराच्या आत जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील इंडियाना येथील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. आधी वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, आपल्याकडे बंदूक नाही, पण नंतर तपासात त्यांच्या घरातून एक बंदूक सापडली. मुलाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वडिलांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी असंही सांगितलं की बंदूक पूर्णपणे लोडेड होती. मात्र, सुदैवाने या घटनेत काहीही अनर्थ घडला नाही. Nepal plane crash : नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा एअर हॉस्टेसने केलेला ‘तो’ VIDEO आला समोर या घटनेशी संबंधित व्हिडिओ @shannonrwatts नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 14 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात