जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO

हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO

हेलमेटशिवाय दिसताच वाहतूक पोलिसाने अडवलं; दुचाकीस्वाराने केला असा जुगाड की चलानही कापता आलं नाही, VIDEO

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती अतिशय आरामात बुलेटवर बसून हळूहळू येत आहे. इतक्यात समोर असलेल्या ट्राफिक पोलिसाने त्याला थांबवलं. त्याने हेलमेटही घातलेलं नव्हतं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 जानेवारी : जेव्हा लोक रस्त्यावर दुचाकी चालवतात तेव्हा त्यांना नेहमी भीती असते की काहीतरी चूक झाल्यास वाहतूक पोलीस त्यांना थांबवेल. मात्र, तुमच्याकडे परवान्यासह सर्व कागदपत्रे असतील, तर तुम्हाला भीती वाटत नाही. काही लोक असेही आहेत जे जुगाड लावून गाडी चालवण्यात माहीर आहेत. यात हे लोक आपल्या चुका ऐनवेळी अगदी सहज सुधारतात आणि या परिस्थितीतून आरामात बाहेर येतात. इवल्याशा माकडाने फोडला वाघाला घाम; शिकारीच्या प्रयत्नात असतानाच झाली वाईट अवस्था, मजेशीर VIDEO भारतात जुगाड सिस्टिम अतिशय लोकप्रिय आहे. यात लोक अनेकदा काहीतरी मोठं किंवा वेळ लागणारं काम अगदी काही मिनिटात करतात. सध्या एका व्यक्तीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याने आपली हौस पूर्ण करण्यासाठी रॉयल एनफील्डची बुलेट बनवली. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे ही बुलेट पेट्रोलशिवाय चालते आणि ती इलेक्ट्रिकही नाही. ही अजब गाडी पाहून ट्राफीक पोलीसही थक्क झाला.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती अतिशय आरामात बुलेटवर बसून हळूहळू येत आहे. इतक्यात समोर असलेल्या ट्राफिक पोलिसाने त्याला थांबवलं. त्याने हेलमेटही घातलेलं नव्हतं, मात्र तरीही ट्राफिक पोलीस चालान फाडू शकला नाही. आता तुम्ही विचारात पडला असाल की कोणी रॉयल एनफील्डची बाईक स्वतः कशी बनवू शकतो. तर याचं उत्तरही तुम्हाला मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

या व्यक्तीने सायकल मॉडिफाय करून बुलेट बनवली, जी रॉयल एनफील्डसारखीच दिसत आहे. मात्र ती चालवण्यासाठी सायकलप्रमाणेच पँडल मारावा लागतो. तुमची सायकल मोटर बाईक नसेल तर पोलीसही चालान कापू शकत नाही. त्यामुळे तो हेलमेट नसतानाही वाहतूक पोलिसाच्या समोरून अगदी आरामात निघून गेला. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. Biker Boy Zahir नावाच्या फेसबुक यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 21 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 9 लाखाहून अधिकांनी लाईकही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात