नवी दिल्ली 06 मे : कांगारू म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभा राहातं, ते म्हणजे आई कांगारू आणि तिच्या पिशवीतून बाहेर डोकावणारं पिल्लू. हे दृश्य पाहायला आपल्या अतिशय प्रेमळ वाटतं. सध्या एका कांगारूचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ अतिशय अनोखा आणि खास आहे. कारण यात एका व्यक्तीने आई कांगारूचा पेहराव केल्याचं पाहायला मिळतं (Man Dressed up as Kangaroo). चिमुकल्याने घेतली पाण्यात उडी; बचावासाठी आई धावून आली अन्.., अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Baby Kangaroo Video) तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आई कांगारूप्रमाणे पेहराव करून आपल्या घरातून बाहेर येतो. यानंतर बागेमध्ये खेळणारं कांगारूचं लहान पिल्लू हे बघतं आणि ही आपली आईच असल्याचं त्याला वाटतं. यामुळे हे पिल्लू धावत येतं आणि कांगारूच्या पिशवीमध्ये शिरतं. हा व्हिडिओ अतिशय खास असून नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
This man got dressed up as a mother Kangaroo for the baby kangaroo drifting into the garden to get into the pouch. Love the Aussies💕
— Susanta Nanda (@susantananda3) May 6, 2022
VC:Theo pic.twitter.com/ERWCXdsc8V
कांगाारूच्या अंडय़ाचं फलन होतं तेव्हा अंडं फार छोटं म्हणजे ०.१२ मिमी व्यासाचं असतं. म्हणजेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एखाद्या वाळूच्या कणाइतकं असतं. जेव्हा हे पिल्लू जन्माला येतं तेव्हा ते जेमतेम २ सेंमी लांब आणि १ ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचं असतं. म्हणजेच ते एखाद्या बीप्रमाणे असतं. हे पिल्लू जन्मत: आंधळं, केसविरहित आणि अतिश छोटं असतं. सुरुवातीचे जवळपास आठ महिने हे पिल्लू आपल्या आईच्या आजूबाजूलाच राहातं आणि भीती वाटली की आईच्या पिशवीमध्ये दडून बसतं. दोन महिला कॉन्स्टेबल बनल्या अडीच महिन्यांच्या बाळाच्या आई, स्तनपान देऊन वाचवला चिमुकलीचा जीव सध्या व्हायरल होणारा हा कांगारूचा खास व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आतापर्यंत 3 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत याला क्यूट चिटिंग असं म्हटलं आहे.