व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Funny Video Viral) दिसतं की एक व्यक्ती तलावाच्या काठावर उभा राहून मासे पकडत आहे. हा व्यक्ती आपल्या कामात इतका मग्न आहे की त्याचं लक्ष फक्त पाण्याकडेच आहे. तर त्याच्या मागे एक मेंढी उभा असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मेंढी काही वेळ या व्यक्तीच्या मागेच उभा राहाते आणि नंतर काही पाऊलं मागे जाऊ लागते. अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? मेंढी नेमकी मागे का जात असेल, असा प्रश्न व्हिडिओ पाहताना पडतो. मात्र, काही पाऊलं मागे गेल्यावर अचानक ही मेंढी अगदी वेगात धावत येते आणि मासे पकडणाऱ्या व्यक्तीला मागून धडक देते. यानंतर हा व्यक्ती थेट पाण्यात कोसळतो. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत 17 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 63 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.That was a very calculated move pic.twitter.com/NBYOy73MH6
— Animals Being Jerks (@Animalbelngjerk) May 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Other animal