मुंबई, 16 मे : सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगली प्राणी म्हटलं की ते एकमेकांची शिकार करतानाच या व्हिडीओत दिसतात. सिंह, बिबट्या, चित्ता, वाघ अशा प्राण्यांचे इतर प्राण्यांवर हल्ला करतानाचेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Leopard deer Video viral), जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. एक खतरनाक बिबट्या ज्याच्यासमोर दोन दोन शिकारी असूनही त्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही
(Leopard deer drinking water together).
दोन हरणं आणि एक बिबट्या तिघंही एकाच तलावात शांतपणे पाणी पिताना दिसले. व्हिडीओत पाहू शकता. दोन हरणं दोन बाजूने एक पाण्यात आणि एक किनाऱ्यावर. या दोघांच्या मध्ये समोर नदीच्या किनाऱ्याजवळ एक बिबट्या आहे. तिघांमध्ये मोजकंच अंतर आहे. पण ना बिबट्या या हरणांवर हल्ला करत ना, हरणं त्याला घाबरून तिथून पळतात.
एरवी तुम्ही पाहिलं असेल की सिंह, बिबट्या असे प्राणी दिसले की जंगलातील इतर प्राणी धूम ठोकतात. पण इथं मात्र उलटच दिसत आहे. दोन्ही हरण या बिबट्यासमोर अगदी बिनधास्तपणे छाती ताणून उभे आहेत. त्याच्या नजरेला नजर मिळवून त्याच्याकडे पाहत आहे. तर नेहमी शिकार दिसताच त्यावर तुटून पडणारा बिबट्याही इथं शांत दिसतो आहे. समोर दोन दोन शिकार असूनही शांत बसला आहे. तो त्यांच्यावर बिलकुल हल्ला करत नाही. तो या हरणांकडे पाहून फक्त गुरगुरतो पण तितकाच तो घाबरलेलाही दिसतो.
हे वाचा - बाबो! थेट जंगलाच्या राजा सिंहाशीच तरुणाने केली मैत्री, 10 वर्षे त्याच्यासोबत राहिला अखेर...; शॉकिंग VIDEO VIRAL
अवघे एक मिनिट चार सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. बिबट्या आता या हरणांवर हल्ला करेल किंवा हरणं आता या बिबट्याला पाहून धूम ठोकतील असं वाटतं. पण शेवटपर्यंत तसं काही होतच नाही. किंबहुना या बिबट्यापासून या हरणांना काही धोका आहे, हे आपल्यालाही या व्हिडीओत दिसून येत नाही.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून बहुतेकांना आश्चर्य वाटलं आहे. तर काहींनी जंगल बुक फिल्ममधील संधी काला सीन आठवला आहे. जिथं सर्व प्राणी एकमेकांना नुकसान न पोहोचवता एकत्र शांतपणे राहतात.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना हा बिबट्या या हरणांची शिकार का करत नाही, याचं कारणही दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वन्यप्राणी खेळासाठी शिकार करत नाही. याचा अर्थ त्यांना शिकारीची गरज नाही तर ते नाही करत. त्यांचं आयुष्य आणि भूक शिकारीवर अवलंबून आहे. त्यासाठी ते प्रत्येक वेळी इतर प्राण्यांची चिरफाडच करतात असं नाही. जर एखाद्याची भूक मिटली असेल तर इतर प्राण्यांना तो कोणतीच हानी पोहोचवत नाही.
हे वाचा - तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना बाटलीने पाजलं पाणी; अहमदनगरमधील वनकर्मचाऱ्याचा Video Viral
काही युझर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना यामागी कारणं सांगितलं आहे. काहींच्या मते हा सांभर हरिण आहे, जो शक्तीने बिबट्यावर भारी पडू शकतो, त्यामुळे बिबट्या त्याच्यावर हल्ला करत नाही. काही युझर्सनी बिबट्यची तहान त्याच्या भुकेपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्याने अन्नाऐवजी पाण्याला प्राधान्य दिलं. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.