Home /News /viral /

अवाढव्य अजगर मानेभोवती गुंडाळून देत होता पोझ; VIDEO चा शेवट पाहून अंगावर काटा येईल

अवाढव्य अजगर मानेभोवती गुंडाळून देत होता पोझ; VIDEO चा शेवट पाहून अंगावर काटा येईल

अजगराने तरुणाच्या मानेभोवती विळखा घातला आणि पुढे जे घडलं ते अंगाचं पाणी पाणी करणारं आहे.

  मुंबई, 17 मे : छोटासा साप दिसला तरी आपल्याला घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत ज्यांना सापशी खेळायला आवडतं. अगदी अवाढव्य अजगर ज्याला पाहून आपल्या अंगाचं पाणी पाणी होतं, अशा अजगरासोबतही जीवघेणे खेळ करताना दिसतात. पण हा खेळ किती भयावह ठरू शकतो, याचा थोडाही विचार करत नाही. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man posing with giant python). भलामोठा अजगर जो आपल्या शिकाराला विळखा घालून त्याच्या शरीराचं पाणी पाणी करतो. एखाद्याला अख्खाच्या अख्या जिवंत गिळतो. अशा अजगराला एका व्यक्तीने स्वतःच आपल्याभोवती विळखा घालू दिला. किंबहुना त्याने त्याला आपल्या मानेवरच घेतलं. काळ्याकुट्ट भयंकर अजगराला मानेवर घेऊन तो कॅमेऱ्यासमोर पोझ देऊ लागला (Python Attack video). तरुणाचा व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी भरते. पण त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसत नाही. पण शेवटी तो अजगरच आहे. व्हिडीओचा शेवट पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. सुरुवातीला बिनधास्तपणे पोझ देणारा या तरुणाचीही शेवटी हवा टाइट झाली. हे वाचा - अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? व्हिडीओत पाहू शकता शेवटी अजगर या व्यक्तीच्या मानेजवळ येतो आणि व्यक्तीला दंश करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी व्यक्तीसुद्धा घाबरते. अजगराला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि आपलं तोंड अजगराच्या तोंडापासून लांब नेते.
  View this post on Instagram

  A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

  अशाच एकाच तरुणीचाही व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी हातात साप घेऊन त्याच्यासोबत मस्ती करताना दिसली. सापाने अचानक या तरुणीसोबत जे काही करतो, ते ती आयुष्यभर विसरणार नाही.
  आपण पाहू शकता की तरुणीने तिच्या हातात एक घातक साप धरला आहे. यादरम्यान ती सापाशी खेळण्याचा प्रयत्न करते. ती तरुणी त्या धोकादायक सापाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. दरम्यान, साप त्या तरुणीवर चिडतो. यानंतर त्याने तरुणीच्या उजव्या मनगटाचा चावा घेतला. हे वाचा - अजगराला अंडी उबवता यावीत म्हणून कंपनीचा मोठा निर्णय; 54 दिवस थांबवलं महामार्गाचं काम साप अनेक वेळा मुलीचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. यामुळे तरुणी घाबरते. व्हिडिओमध्ये ती या धोकादायक सापापासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहे. एकदा तर या सापाने तिची बोटंच आपल्या तोंडात पकडल्याचं दिसतं. snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका भयावह आहे की इंटरनेटवर तो चर्चेचा विषय बनला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Python, Snake, Snake video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या