मुंबई, 03 जून : जीवन-मृत्यू तसा कुणाच्या हातात नाही. पण जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं आपल्या हातात नक्कीच आहे.त्यामुळेच कित्येक रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांनाही देव मानलं जातं. पण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरच असायला हवं असं नाही. याचाच प्रत्यक देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man saved dog video). ज्यात एका व्यक्तीने फक्त हातानेच चमत्कार करून दाखवला आहे. त्याने रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या मुक्या जीवाला पुन्हा जिवंत केलं आहे (Man saved dog life by cpr). रस्त्यावर एक श्वान आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता, अंतिम श्वास घेत होता. रस्त्यावर तो मृतावस्थेत पडला होता. मरणाच्या दारात पोहोचलेल्या या श्वानासाठी देवदतू बनून आली एक व्यक्ती. जिने या श्वानाला पुनर्जीवन दिलं आहे. फक्त हातानेच त्याने कमाल करून दाखवली आहे. व्यक्तीने हात लावताच मृतावस्थेत असलेला हा श्वान जिवंत झाला. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा - VIDEO - खेळता खेळता पाण्यात बुडाला चिमुकला, ओरडूही शकला नाही; पण पुढच्याच क्षणी झाला चमत्कार व्हिडीओत पाहू शकता एक श्वान रस्त्यावर पडलेला आहे. त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नाही आहे. एक व्यक्ती त्या श्वानाजवळ आहे जी या श्वानाला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. श्वानाला पाठीवर झोपवून आपल्या दोन्ही हातांनी ती या श्वानाच्या छातीवर दाब देताना दिसते. हळूहळू श्वानाचाही श्वासोच्छवास सुरू झालेला दिसतो. तो मध्येच ओरडतोसुद्धा. तेव्हा श्वान जिवंत होऊ शकतो.याची खात्री या व्यक्तीला होते आणि ती प्रयत्न करत राहते.
Sometimes Miracles are Just Good People with Kind Hearts.❤️ pic.twitter.com/iIncjYBQIi
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) June 3, 2022
अखेरच चमत्कार होतो. श्वान अचानक जिवंत होतो आणि धाडकन उठून आपल्या पायांवर उभा राहतो. व्यक्तीचे श्वानाला वाचवण्याचे प्रयत्न यशस्वी होतात. तेव्हा तिथं उपस्थित लोकही हैराण होतात. ते आश्चर्याने ओरडत असल्याचा आवाजही येत आहेत. काहीतरी मॅजिक पाहिल्यासारखं त्यांना वाटतं. हे वाचा - VIDEO - खेळता खेळता पाण्यात बुडाला चिमुकला, ओरडूही शकला नाही; पण पुढच्याच क्षणी झाला चमत्कार हा व्हिडीओ पाहून मुक्या जीवाचा जीव वाचवणाऱ्या या व्यक्तीचं कौतुक केलं जातं आहे. या व्यक्तीने ज्या पद्धतीने या श्वानाचा जीव वाचवला त्याला सीपीआर म्हटलं जातं. बेशुद्ध झालेल्या, श्वास कोंडलेल्या किंवा हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचा आपात्कालीन परिस्थितीत याच पद्धतीने जीव वाचवता येऊ शकतो.

)







