मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नात वहिनी-दीरावर खिळल्या सर्वांच्या नजरा; असं काही केलं की तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

लग्नात वहिनी-दीरावर खिळल्या सर्वांच्या नजरा; असं काही केलं की तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचताच वहिनी-दीराने एकत्र असं काही केलं की तिथं उपस्थित सर्वजण थक्क झाले.

लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचताच वहिनी-दीराने एकत्र असं काही केलं की तिथं उपस्थित सर्वजण थक्क झाले.

लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचताच वहिनी-दीराने एकत्र असं काही केलं की तिथं उपस्थित सर्वजण थक्क झाले.

    मुंबई, 03 जून : लग्नाच्या हॉलमध्ये आल्यानंतर सर्वांचं लक्ष असतं ते नवरा-नवरीकडे पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात नवरा-नवरीऐवजी वहिनी आणि दीर दिसत आहेत (Devar Bhabhi Video) . नवरा-नवरीऐवजी सर्वांच्या नजरा या वहिनी-दीराच्या जोडीवरच खिळल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे (Brother in law and sisteri in law). लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचताच या दोघांनी असं काही केलं की तिथं उपस्थित सर्वजण थक्क झाले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे (Devar Bhabhi Dance Video). वहिनी-दिराचं नातं जे शब्दात मांडणं अशक्य. कधी ते भाऊ-बहीण असतात, कधी मायलेक आणि कधी मित्रमैत्रिणी. बहुतेक मुलींना सासरी नवऱ्यानंतर सर्वात जवळचं कोण असतं तर तो म्हणजे दीर. त्यांच्या नात्यात कोणतंही बंधन नसतं. फक्त मजा, मस्ती आणि मस्करी. अशाच वहिनी-दिराच्या जोडीचा हा भन्नाट व्हिडीओ आहे. हे वाचा - नवऱ्याने बायकोबाबत बाईकवर असं काही लिहिलं की...; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO व्हिडीओत पाहू शकता हॉलमध्ये लग्नसोहळा होतो आहे. डान्सफ्लोअरवर काही लोक डान्स करताना दिसत आहे. याच डान्सफ्लोअरवर आहे ती वहिनी-दिराची जोडी. सपना चौधरीचं गजबन गाणं ऐकायला येतं आहे. दिर-वहिनी समोरासमोर उभे आहेत. दिर सुरुवातीला हातावरे करताना दिसतो. डान्स स्टेप्स करतो आणि मग त्याच्या समोर उभी असलेली त्याची वहिनीही थिरकू लागते. दोघंही गाण्यावर एकत्र ठुमके लगावताना दिसतात. डान्समध्ये ते इतके मग्न झाले आहेत की त्यांना दुसरं काहीच भान राहिल आहे. अंकीत जांगिड असं या व्हिडीओत डान्स करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या Ankit Jangid या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा - OMG! पुंगी वाजताच डुलू लागली आजी; नागिण बनून नातवालाच डसली; पाहा Naagin Dance Video वहिनीसोबत डान्स करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्या चॅनेलवर असे त्यांचे बरेच डान्स व्हिडीओ आहेत. आता हा व्हिडीओ पाहा यात या वहिनी-दिराच्या जोडीने डीजेवर जबरदस्त ठुमके लगावले आहेत. व्हिडीओत पाहू शकता, वहिनीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर दिराने फॉर्मल शर्ट पँट घातलं आहे. दोघंही अशा वेशात डीजे फ्लोरवर डान्स करताना दिसत आहे. वहिनीला नाचताना आनंदात पाहून दिरालाही तितकाच उत्साह वाटतो आहे. तोसुद्धा जोशात नाचत वहिनीला एकप्रकारे प्रोत्साहनच देतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dance video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या