नवी दिल्ली 13 मार्च : तुम्ही जर रेल्वेने प्रवास केला असेल तर अनेकदा पाहिलं असेल की जनरल डब्यात बसायलाही जागा नसते. यामुळे अनेक लोक उभा राहूनच प्रवास करतात तर अनेकजण खाली फ्लोअरवर बसून. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Video Viral) आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. छतावरुन उडी घेतली पण तोल गेला; अनेक फुटांवरुन खाली कोसळला, VIDEO ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यानंतर या व्यक्तीने जुगाड करून स्वतःसाठी एक सीट बनवली (Jugaad For Seat in Train). यानंतर तो जेव्हा आपल्या जुगाड केलेल्या सीटवर बसू लागला तेव्हा धाडकन खाली पडला. हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्यक्तीचा जुगाड फेल होतोच मात्र त्याचा हा प्रयत्न अतिशय विनोदीही ठरतो.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की या व्यक्तीला ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही. यानंतर तो आपल्याजवळ असलेल्या एका कापडाच्या मदतीने जुगाड सीट बनवतो. या व्यक्तीचा जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल की हा व्यक्ती अतिशय इन्होव्हेटिव्ह आहे. मात्र त्याचा जुगाड फेल होतो तेव्हा तुम्हाला त्याचं हे कृत्य अतिशय विनोदी वाटेल. तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती दोन्ही बाजूच्या मध्ये असलेल्या जागेत चादर बांधतो आणि त्यात झोपण्याचा प्रयत्न करतो. खुर्चीवर बसून काम करत होता व्यक्ती; इतक्यात सरपटत आला विषारी साप अन्.., VIDEO व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की हा व्यक्ती चादरीवर चढून झोपण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात एका बाजूने ही चादर निसटते. यामुळे हा व्यक्ती धाडकन खाली कोसळतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत यूजरने लिहिलं, इतका जुगाड चांगला नाही. व्हिडिओसोबत बॅकग्राऊंडला ‘करले जुगाड़’ गाणं लावण्यात आलं आहे.