नवी दिल्ली 10 जून : जीव घेणाऱ्यापेक्षा, जीव वाचवणारा खूप मोठा असतो, असं म्हटलं जातं. आजकालच्या युगात कोणीही कोणाच्या मदतीसाठी सहजासहजी धावून येत नाही. अशात आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो ही गोष्टी चुकीची सिद्ध करणारा आहे (Woman Save Pet Dog from Bear). व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक जंगली अस्वल एका रहिवासी भागात असलेल्या घरामध्ये आपल्या पिल्लांसोबत शिरताना दिसतं. बापरे! व्यक्तीने हाताने उचलले डझनभर साप; पुढे काय घडलं पाहा, थरकाप उडवणारा VIDEO हे अस्वल घराच्या मागील बाजूला असलेल्या छतावर चढतं. इतक्यात घरातील तीन चार श्वान धावत जातात आणि अस्वलाला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र अस्वल त्यांच्यावर हल्ला करू लागतं. तरीही श्वान माघार न घेता वारंवार त्याच्यावर धावून जात त्याला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात या श्वानांचा मालकीण तिथे पोहोचते.
तिला दिसतं की अस्वल तिच्या पाळीव कुत्र्यांना नुकसान पोहोचवत आहे, तेव्हा तिला राहावत नाही. यानंतर ती अस्वलाच्या जवळ जाऊन त्याला धक्का देऊन खाली पाडते आणि आपल्या पाळीव श्वानांना घेऊन तिथून पळून जाते. तलावात अंघोळ करताना हंसाने केला भयंकर हल्ला; बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला VIDEO फेसबुकवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोकांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. ही महिला आपल्या पाळीव श्वानांवर खूप प्रेम करते, असं अनेकांनी कमेंट करत म्हटलं. एकाने लिहिलं की हे श्वान खूप भाग्यवान आहेत. तर आणखी एकाने असंही लिहिलं की मी या महिलेच्या जागी असतो तर मीही हेच केलं असतं. हा व्हिडिओ 9.9 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर लाखो लोकांनी लाईकही केला आहे