मुंबई, 08 जून : बॉक्सिंग पाहायला जितकी मजा येते, तितकीच पाहताना धडकी भरते. ताकदीचा हा खेळ (Boxing video viral). ज्यात बरोबरीचे म्हणजे समान ताकद असलेले खेळाडूही एकमेकांवर भारी पडतात. तसं दोन वेगवेगळ्या ताकदीच्या बॉक्सर्सची फाइट तुम्ही पाहिलीच असेल. पण या दोन बॉक्सर्सपैकी एक प्रौढ व्यक्ती आणि एक लहान मुलगा असेल तर… ताकद, बॉडीचा विचार करता साहजिकच प्रौढ व्यक्ती जिंकेल असं आपण म्हणू. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका चिमुकल्याने बड्या बॉक्सरला एका पंचातच गार केलं आहे. एक प्रौढ आणि एक छोट्या बॉक्सरच्या फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. भले तो वयान आपल्या समोर असलेल्या बॉक्सरपेक्षा कमी आहे, पण त्याची ताकद, स्टॅमिना आणि पंचिंग स्किल मात्र त्याच्यापेक्षा भारी आहे. जे बॉक्सिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण आणि एक लहान मुलगा बॉक्सिंग करताना दिसत आहेत. कदाचित हा तरुण त्या मुलाचा कोच असावा. सुरुवातीला तरुण लहान मुलावर अटॅक करतो. आपल्या दोन्ही हातांनी वेगाने वार करत राहतो. पंचावर पंच मारत जातो. लहान मुलगाही आपला बचाव करताना दिसतो. हे वाचा - रेस जिंकल्याच्या उत्साहात सायकलिस्टकडून घडलं भयंकर कृत्य; थेट रुग्णालयात पोहोचली बायको शेवटी त्याच्यात अशी ऊर्जा, उत्साह संचारतो की तो मुक्क्यांचा वार करणाऱ्या तरुणाला एकच मुक्का मारतो. लहान मुलाच्या एका बुक्कीतच तो तरुण जमिनीवर कोसळतो.
मुलाचं पंचिंग स्किल पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. नेटिझन्स त्याचं कौतुक करत आहेत. हा मुलगा भविष्यात खूप मोठा बॉक्सर होईल, अशीच कमेंट अनेकांनी केली आहे.