नवी दिल्ली 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा असे काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं, जे पाहून कोणीही हैराण होतं. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन वाघांना बॉटलनं दूध पाजताना दिसतो (Man Feeding Milk to Tigers with Bottle). ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) अब्सल्यूट यूनिट्स नावाच्या हँडलवरुन शेअर केला गेला आहे. मिळालेल्या माहितनुसार, हा व्हिडिओ जुना आहे आणि याआधी हा इंटरनेटवर व्हायरल झाला होता. मात्र, सध्या हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
VIDEO: पहिली ओळ म्हटले आणि थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले; खासदारच विसरले राष्ट्रगीत
या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती हातामध्ये दोन बॉटल घेऊन उभा आहे. याचदरम्यान दोन मोठे वाघ त्याच्याजवळ येतात आणि या व्यक्तीच्या दोन्ही खांद्यांवर आपले पाय ठेवून उभा राहतात. यानंतर व्हिडिओमध्ये दिसणारा युवक दुधाच्या दोन्ही बॉटल या वाघांच्या तोंडामध्ये देतो आणि दोन्ही वाघ आरामात हे दूध पिऊ लागतात. वाघांना दूध पाजणारा हा व्यक्ती अतिशय आनंदात आहे आणि तो हे सगळं एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.
Feeding two units pic.twitter.com/exDZ9Bt1mv
— Absolute Units (@absoIute_units) August 13, 2021
या व्हिडिओला फिडिंग टू यूनिट्स असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यासोबतच हा व्हिडिओ पाहणारेही यावर भरपूर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहिलेल्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्यक्ती मृत्यूसोबत खेळत आहे. कारण त्याचा हा स्टंट कधी जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. इतरही अनेकांनी हे सर्व त्या व्यक्तीसाठी जीवघेणं असल्याचं म्हटलं आहे.
या चिमुकलीचे जबरदस्त स्टंट पाहून व्हाल हैराण, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय VIDEO
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर 12 ऑगस्टला शेअर केला गेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत हा व्हिडिओ 1 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 33 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यासोबत 4 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. यासोबतच नेटकरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Tigers, Video viral