लखनऊ 16 ऑगस्ट : लहान मुलांना सुद्धा राष्ट्रीय प्रतीकांची जाणीव आहे. अशात जर एखादा लोकप्रतिनिधीच देशाच्या अभिमानाच्या गोष्टी विसरला तर? अशी प्रकरणे अनेकदा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला समोर येतात. यावेळी मुरादाबादचे सपा खासदार डॉ.एस.टी. हसन यांच्यासोबतही असंच घडलं. ध्वज फडकावल्यानंतर ते राष्ट्रगीतच विसरले (MP ST Hasan Forgot The National Anthem). घडलं असं की खासदाराने गलशहीद पार्कमध्ये ध्वज फडकवताच प्रत्येकानं राष्ट्रगीत गायला सुरुवात केली, पण जेव्हा ते दुसऱ्या ओळीवर अडकले तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.
जेव्हा हे घडलं तेव्हा तेदेखील अस्वस्थ झाले आणि त्यांनी हळूहळू जय हे जय हे म्हणायला सुरुवात केली. मग बाकीचे लोकसुद्धा सरळ शेवटच्या ओळीवर गेले आणि कार्यक्रम संपवून निघून गेले. यानंतर, नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL
याबाबत हसन यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. हसन आपल्या विधानांमुळे (MP ST Hasan's Controversial Statements) अनेकदा चर्चेत असतात. याआधी त्यांनी राम मंदिराबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. 'राम मंदिराचा वाद आता मिटला आहे. मात्र, जेव्हा भाजपचे लोक वर्गणी गोळा करायला बाहेर पडतील, तेव्हा काही विकल्या गेलेल्या मुस्लिमांकडून दगडफेक करून घेतली जाईल. दगडफेकीनंतर काय होईल हे तुम्ही मध्य प्रदेशात पाहिले आहे. याद्वारे हिंदूंना हा संदेश दिला जाईल की आम्ही ही अवस्था करू शकतो.' असं ते म्हणाले होते.
Samajwadi party MP from Moradabad,shame on you. How dare you do this? pic.twitter.com/nsBMsCP8bc
— Pranshu Dutt Dwivedi (@PranshuDutt) August 15, 2021
स्पर्मशिवाय 'प्रेग्नेंट' झाली तरुणी; पोटात वाढत होता 13 किलोंचा मृत्यू
संपूर्ण शहरातील विविध संस्थांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला. डीएम शैलेंद्र सिंह यांनी मुरादाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. पोलीस लाईनमध्ये एसएसपी पवन कुमार यांनी ध्वजारोहणानंतर चांगले काम करणाऱ्या पोलिसांचा सन्मान केला. DRM ने रेल्वे स्टेडियमवर तिरंगा फडकवला. मात्र, खासदारासोबत झालेल्या या घटनेची लोकांनी खिल्ली उडवली. सामान्य जनतेचं असं म्हणणं आहे, की जेव्हा खासदार किंवा देश चालवणारे लोकच राष्ट्रगीत विसरतील तेव्हा इतरांपर्यंत काय संदेश पोहोचेल. सोबतच हा राष्ट्रगीताचा अपमान असल्याचं काहींनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.