नवी दिल्ली 26 डिसेंबर : तुम्ही अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास केला असेलच. आजच्या काळात ते सर्वात सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारंही आहे. सामान्य माणसासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनपेक्षा चांगला पर्याय नाही. मात्र, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी आणि प्रवास करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की, चालत्या ट्रेनमध्ये कधीही चढू किंवा उतरू नये, रुळावर कधीही चालू नये, कारण या गोष्टी प्राणघातक ठरू शकतात. आजकाल याच्याशीच संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा येईल. चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल यात एक व्यक्ती रेल्वे अपघातातून अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळतं. ट्रेनमधून पडल्याने तो चालत्या ट्रेनच्या चाकांच्या मध्ये अडकला होता. मात्र अगदी थोडक्यात त्याचा जीव बचावला. थोडीशी चूक त्याचा जीव घेऊ शकली असती. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस कसा रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी पडून आहे, तर एक ट्रेन त्याच्यावरून जात आहे. तो तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा एक मित्र त्याला बाहेरून अडवत होता. कारण या कामात त्याच्या जीवाला थेट धोका होता.
Man falls off train and escapes death by crawling out between the wheels. pic.twitter.com/31YzfVkUVN
— Morbid Knowledge (@Morbidful) December 23, 2022
तिथून निघताना तो ट्रेनच्या चाकाखाली आला असता तर त्याचा जीव गेला असता. शेवटी कसा तरी जीव मुठीत घेऊन तो रुळावरून बाहेर पडला. बाहेर पडायला दोन सेकंदही उशीर झाला असता तर त्याला नक्कीच जीव गमवावा लागला असता. हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Morbidful नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माणूस ट्रेनमधून पडला आणि ट्रेनच्या चाकांच्या मधोमध बसून मृत्यूच्या दारातून परतला’. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 83 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि… प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, की तो खरंच भाग्यवान होता, मात्र मृत्यूपासून वाचण्यासाठी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. पुढच्यावेळी सतर्क राहा. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत म्हटलं, की अखेर त्याने तेव्हाच बाहेर पडण्याचा प्रयत्नच का केला जेव्हा ट्रेन सुरू होती? हे ट्रेन पूर्णपणे पुढे जाण्याची वाट बघण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे.