मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नावेत बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न भोवला; दुचाकीसह नदीत कोसळला युवक, पाहा VIDEO

नावेत बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न भोवला; दुचाकीसह नदीत कोसळला युवक, पाहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतं, की एक व्यक्ती आपली बाईक नावेत चढवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात त्याच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही घाबरून जाल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत कधी काय पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. यूजर्स एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ (Funny Videos) शेअर करत राहतात. हे व्हिडिओ लोकांचं भरपूर मनोरंजनही करतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून सगळेच हैराण होतात. सध्या असाच एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. हा व्हिडिओ पाहून हेच समजत नाही, की या व्यक्तीची झालेली अवस्था पाहून त्याच्यासाठी वाईट वाटावं की त्याचा वेडेपणा पाहून हसावं.

VIDEO: अन् पावसात बंद पडलेल्या कार मालकाच्या मदतीला कुत्रा आला धावून

मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती आपली बाईक बोटवर चढवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात त्याच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही घाबरून जाल. या व्यक्ती किनाऱ्यावर असलेल्या लाकडाच्या मदतीनं आपली बाईक नावेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो बाईक कंट्रोल करू शकत नाही आणि थेट नदीत जाऊन कोसळतो. बोटवर उभा असलेला दुसरा व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तोपर्यंत तो पाण्यात पडतो. व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की या व्यक्तीला आपली बाईक नावेत घेऊन जायची होती, मात्र ती थांबली थेट नदीत जाऊन.

मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येत होता फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर endgallbaat नावाच्या अकाऊंटवरुन ही व्हिडिओ क्लिप शेअर केली गेली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही खळखळून हसत आहेत. लोकं हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी कमेंट करत ही दुचाकीस्वाराची चूक असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी त्याच्यासाठी काळजी व्यक्त करत, तो सुखरुप बाहेर येऊ शकला का, असा सवाल केला आहे.

First published:

Tags: Bike riding, Funny video, Shocking video viral