मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येऊ लागला फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम

मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येऊ लागला फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम

टॉयलेटमध्ये त्याला असं काही दिसलं की...

टॉयलेटमध्ये त्याला असं काही दिसलं की...

टॉयलेटमध्ये कोण आहे हे पाहण्यासाठी त्याने दरवाजा उघडला आणि...

  • Published by:  Priya Lad

व्हिएन्ना, 11 ऑगस्ट : तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये (Toilet) मध्यरात्री कुणीच नसेल आणि तरी तिथून तुम्हाला अचानक फ्लशचा आवाज आला (Mysterious Noise In Midnight), तर भीती वाटणं साहजिकच आहे. ऑस्ट्रियातील (Austria)  एका व्यक्तीसोबत असं घडलं. ही व्यक्ती आराम करत असताना अचानक टॉयलेटमधून फ्लशचा आवाज येऊ लागला (Noise from toilet). व्यक्तीने हिंमत करून टॉयलेटचा दरवाजा उघडला. त्यानंतर समोर जे दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला. व्हिएन्नाजवळील  ब्रेटेनफर्टमधील ही घटना आहे.

सामान्यपणे आपल्या घरात कुठूनही आवाज आला आणि आपल्याला भीती वाटत असली तरी तिथं नेमकं काय आहे? कसला आवाज येतो आहे, हे आपण हिंमत एकवटून पाहायला जातो. अशीच डेअरिंग केली ती  या व्यक्तीने  त्याच्या घरात टॉयलेटमधून फ्लशचा आवाज येत होता. तिथं जाऊन पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याचे हातपाय गार पडले. तो ओरडत पळाला. कोणत्या तरी हॉरर फिल्मचा सीन असावा असं त्याला वाटलं.

Credit- Werner Stangl/Newsflash

Credit- Werner Stangl/Newsflash

टॉयलेटमध्ये भूत किंवा अज्ञात व्यक्ती असावी असं वाटलं. पण तिथं कुणी माणूस नाही तर साप बसला होता. टॉयलेटचा दरवाजा उघडताच त्याला विशाल साप दिसला.  तब्बल 6  फूट लांब हा साप होता. त्याने आपात्कालीन सेवेला फोन केला.  अग्निशमन दलाचे अधिकारी त्याच्या घरी दाखल झाला. त्यांनी सापाला कसंबसं करून टॉयलेटमधून बाहेर काढलं आणि जंगलात सोडलं. तो भिंतीच्यामधून टॉयलेट सीटपर्यंत आसा असावा असं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - ज्यांनी टोपी काढली त्यांनाच 'टोपी घातली'; इमोशनल VIDEO मध्ये जबरदस्त ट्विस्ट

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रियातच टॉयलेटमध्ये साप सापडला होता. एका 65 वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला हा साप चावला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

First published:

Tags: Bathroom, World news