मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अन् पावसात बंद पडलेल्या कार मालकाच्या मदतीला कुत्रा आला धावून; VIDEO पाहून तुम्ही सुद्धा कराल कौतुक

अन् पावसात बंद पडलेल्या कार मालकाच्या मदतीला कुत्रा आला धावून; VIDEO पाहून तुम्ही सुद्धा कराल कौतुक

या व्हिडीओमधील महिलेचं नाव लॉरी आहे. ती एक ट्रेन ड्रायव्हर आहे. तिच्या पाळीव कुत्र्याचं नाव पुक (Scotland dog helping car in flood) असल्याची माहिती मिळाली आहे.

या व्हिडीओमधील महिलेचं नाव लॉरी आहे. ती एक ट्रेन ड्रायव्हर आहे. तिच्या पाळीव कुत्र्याचं नाव पुक (Scotland dog helping car in flood) असल्याची माहिती मिळाली आहे.

या व्हिडीओमधील महिलेचं नाव लॉरी आहे. ती एक ट्रेन ड्रायव्हर आहे. तिच्या पाळीव कुत्र्याचं नाव पुक (Scotland dog helping car in flood) असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालं आहे. चोरांपासून किंवा हल्लेखोरांपासून संरक्षण करणे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीला व्यक्तीला बोलावणं अशा अनेक गोष्टींमधून हे श्वान आपल्या मैत्रीचे दाखले देत असतात. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला तिच्या पाळीव श्वानाने चक्क लांडग्यापासून (Girl saved by dog from coyote) वाचवलं होतं. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान स्कॉटलंडमध्येही माणसाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका श्वानाचा (Scotland dog helps car in flood) व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावरील पाण्यात अडकलेल्या एका गाडीला बाहेर काढण्यासाठी चक्क एक कुत्रा मदत करत असताना दिसून आला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Scotland dog viral video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे या कुत्र्याचं जगभरातून कौतुक होतंय.

स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी (Scotland Flood) झालं आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे, एक कार त्या पाण्यात (Scotland car stuck in flood) अडकली होती. या गाडीमध्ये दोन महिला होत्या. अगदी गाडीच्या खिडक्यांपर्यंत पाणी आल्यामुळे आतील दोन्ही महिला अत्यंत घाबरल्या होत्या. यावेळी बाजूने जाणाऱ्या एका महिलेने हे पाहिलं. तिने पुढे येत या कारला धक्का देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, तिच्यासोबतच तिचा पाळीव कुत्राही (Scotland dog pushes car stuck in flood) या गाडीला धक्का देत होता. खरंतर या श्वानाचे पायही खाली जमिनीला टेकत नव्हते. पण, तरीही पोहत पोहतच तो गाडीला धक्का (Scotland dogs helps car in flood) देत होता. हा सर्व प्रकार कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येऊ लागला फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम

" isDesktop="true" id="590645" >

या व्हिडीओमधील महिलेचं नाव लॉरी आहे. ती एक ट्रेन ड्रायव्हर आहे. तिच्या पाळीव कुत्र्याचं नाव पुक (Scotland dog helping car in flood) असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी केलेल्या या मदतीचा व्हिडिओ व्हायरल व्हिड्स (Viral Vids) या यूट्यूब चॅनलवरुन अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत, तसेच आपापल्या अकाऊंट्सवरुन शेअरही करत आहेत. माणूस आणि प्राण्यांमधील नात्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं मत नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Video viral