नवी दिल्ली, 01 जून : सोशल मीडियावर बरेच विचित्र व्हिडीओही व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असे असतात ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका बाईकस्वाराचा हा व्हिडीओ. ज्यात एक बाईकस्वार बाईकवरून उतरला आणि तो अचानक गायब झाला. व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे. बाईकवरून उतरलेली व्यक्ती अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. जे पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. असं या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं ते पाहूयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्याशेजारी काही गाड्या पार्क आहेत. तिथं एक बाईकस्वार येतो. तोसुद्धा आपली बाईक तिथं पार्क करतो. बाईकवरून तो उतरतो. पण जसा तो बाईकवरून उतरतो, तसा तो जमिनीत सामवतो. हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्यालाही धडकी भरते. VIDEO - चमत्कार झाला! चिमुकलीला गाडीने चिरडलं, पुढच्याच क्षणी स्वतःच उठून चालू लागली तिथं एक खड्डा आहे. ज्यावर एक पत्रा टाकला आहे. जशी ही व्यक्ती त्या पत्र्यावर पाय ठेवते, तसा पत्रा आत जातो आणि ती व्यक्ती त्या खड्ड्यात पडते. मागोमाग बाईकही त्या खड्ड्यावर आडवी होते. व्यक्तीसोबत घडलेली दुर्घटना पाहून काही लोक त्याच्या मदतीसाठी धावून येतात. खड्ड्यावर पडलेली बाईक बाजूला करतात. तोपर्यंत खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीचा हात बाहेर दिसतो. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने व्हिडीओत या व्यक्तीला काही झालेलं दिसत नाही आहे. कारने दोघांना चिरडलं, पण त्यानंतर जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक; Shocking Video Viral @suddenlyhapend ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.