नवी दिल्ली 29 ऑगस्ट : आजकालच्या तरुणांमध्ये स्टंटबाबत (Stunt) प्रचंड क्रेज दिसून येते. असे लोक कधी दुचाकी, कधी सायकल आणि कधीकधी तर मिळेल तिथे आपलं कौशल्य दाखवण्यास सुरुवात करतात. अनेकदा यांचे स्टंट प्रचंड व्हायरल (Viral Stunt Video) होतात तर अनेकदा याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं, की एक व्यक्ती सायकलवर स्टंट करत आहे. मात्र, अचानक त्याचा बॅलन्स बिघडतो आणि यानंतर जे काही घडतं ते हा व्यक्ती कधीच विसरणार नाही. इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती लहान मुलांची सायकल चालवत त्यावर स्टंट करत आहे. मात्र, इतक्यात या व्यक्तीचा बॅल्नस बिघडतो आणि तो धाडकन खाली आपटतो. मात्र, सुदैवानं दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या गाडीकडे तो पडला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत.
सुडौल शरीरासाठी 20 लाख रुपये खर्चून तिनं केली Butt Surgery; आता नीट बसताही येईना एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की अशा प्रकराचे स्टंट करण्याआधी खूप सराव करायला हवा. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की अशा प्रकारचे धोकादायक स्टंट आपण रस्त्यावर करणं चुकीचं आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही हैराण झाला असाल आणि या व्यक्तीच्या या कृत्याचा तुम्हाला रागही आला असेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ @HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 43 हजाराहून अधिकांनी पाहिला आहे तर 1 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.