मराठी बातम्या /बातम्या /Viral /सुडौल शरीरासाठी 20 लाख रुपये खर्चून तिनं केली Butt Surgery; आता नीट बसताही येईना

सुडौल शरीरासाठी 20 लाख रुपये खर्चून तिनं केली Butt Surgery; आता नीट बसताही येईना

काझुमी स्क्वर्ट्स (Kazumi Squirts) नावाच्या एका मॉडेलने (Model) शरीराच्या सुडौलतेसाठी लाखो रुपये खर्च केले. त्या शस्त्रक्रियेमुळे आता तिला नीट बसताही येत नाही.

काझुमी स्क्वर्ट्स (Kazumi Squirts) नावाच्या एका मॉडेलने (Model) शरीराच्या सुडौलतेसाठी लाखो रुपये खर्च केले. त्या शस्त्रक्रियेमुळे आता तिला नीट बसताही येत नाही.

काझुमी स्क्वर्ट्स (Kazumi Squirts) नावाच्या एका मॉडेलने (Model) शरीराच्या सुडौलतेसाठी लाखो रुपये खर्च केले. त्या शस्त्रक्रियेमुळे आता तिला नीट बसताही येत नाही.

  नवी दिल्ली 28 ऑगस्ट : सुंदर दिसण्यासाठी कोण काय करील, हे सांगता येत नाही. त्यात मॉडेलिंग किंवा सिनेमा क्षेत्रातल्या व्यक्तींना तर सतत चर्चेत आणि प्रकाशात राहण्यासाठी शरीराचं सौंदर्य राखावंच लागतं. सध्याचे दिवस सोशल मीडियाचे आहेत. त्यामुळे हाती एखादा मोठा प्रोजेक्ट असला किंवा नसला, तरी अशा व्यक्तींना सोशल मीडियातून सतत चर्चेत राहता येतं. मात्र त्यासाठी शरीर सुडौल (Curvy Body) असणं गरजेचं असतं. त्यासाठी मॉडेल्स वाट्टेल ते करायला तयार असतात. अलीकडेच अमेरिकेत (USA) मियामी (Miami) इथे राहणाऱ्या काझुमी स्क्वर्ट्स (Kazumi Squirts) नावाच्या एका मॉडेलने (Model) शरीराच्या सुडौलतेसाठी लाखो रुपये खर्च केले. त्या शस्त्रक्रियेमुळे आता तिला नीट बसताही येत नाही.

  हे ऐकूनच आपल्याला धक्का बसला असला, तरी तिने स्वतः हा खर्च करताना किती पैसे मिळवायचे याचं एक लक्ष्यही स्वतः समोर ठेवलं होतं. ते तिने अल्पावधीतच पूर्ण केलं. त्यामुळे ती खूश आहे. 'डेली स्टार'च्या हवाल्याने 'झी न्यूज'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  शर्टाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक घेतला पेट; CCTV मध्ये कैद झाला VIDEO

  अमेरिकेत मियामी इथे राहणारी ही मॉडेल Kazumi Squirts या नावाने प्रसिद्ध आहे; मात्र तिचं ते खरं नाव नाही. आपल्या शरीराचा आकार सुडौल, परफेक्ट (Perfect Body Shape) हवा असं अनेक स्त्रियांना वाटत असतं. तसंच तिलाही वाटायचं. त्यात ती मॉडेलिंगही करते. त्यामुळे तिची इच्छा अधिक तीव्र होती. त्यासाठी आपलं वजन कमी करून शरीराचा आकार हवा तसा करण्याकरिता तिने पारंपरिक उपाय करून पाहिले; मात्र शरीराचे कर्व्ह्ज तिला हवे तसे न झाल्याने तिने अखेर सर्जरीचा (Surgery) मार्ग अवलंबायचं ठरवलं.

  तिने त्यासाठी आपल्या पार्श्वभागाची (Butt Surgery) आणि छातीची (Breast Surgery) सर्जरी करून त्यांचा आकार अत्यंत सुडौल करून घेतला. काझुमीने दिलेल्या माहितीनुसार, Butt Surgery साठी तिला 28 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल 20 लाख 76 हजार 634 रुपये एवढा खर्च आला. त्याशिवाय Breast Surgery साठी तिने 8 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 5 लाख 93 हजार 324 रुपये खर्च केले. म्हणजे सुमारे 27 लाख रुपये खर्चून तिने सुडौल शरीर प्राप्त केलं.

  मोबाइलवर बोलण्याच्या नादात आई बाळालाच विसरली; Video पाहून लोकांचा संताप

  ही सर्जरी केल्यानंतर तिला बरीच काळजी घ्यावी लागत आहे. Buttocks चा आकार बदलू नये म्हणून तिथे अतिरिक्त दाब येणार नाही, याची काळजी तिला घ्यावी लागते. म्हणून ती कुठेही जाताना BBL Pillow (Brazillian Butt Lift Pillow) ही एक विशिष्ट प्रकारची उशी सोबत घेऊन जाते. कुठेही बसायचं असेल, तर ती या उशीवरच बसते. त्यामुळे तिच्या Buttocks वर अतिरिक्त दाब येत नाही. हे पाळण्यासाठी तिला मनात आलं तरी अन्य कुठेही बसता येत नाही.

  हे बंधन पाळावं लागत असलं, तरी काझुमी ही सर्जरी केल्यानंतर खूश आहे. कारण ही सर्जरी केल्यानंतर तिने बरेच पैसे कमावले आहेत. सर्जरीनंतर एका महिन्यात 25 हजार अमेरिकी डॉलर्स अर्थात सुमारे 18 लाख 54 हजार 137 रुपये कमावण्याचं उद्दिष्ट तिने ठेवलं होतं. ते तिने स्वतःच्या अपेक्षेपेक्षाही कमी कालावधीत पूर्ण केलं. ती आता महिन्याला जास्तीत जास्त दोन लाख अमेरिकी डॉलर्स अर्थात सुमारे एक कोटी 48 लाख 35 हजार 500 रुपये एवढी कमाई करते.

  First published:
  top videos

   Tags: Model, USA, Viral news