मराठी बातम्या /बातम्या /Viral /वजन कमी करण्याच्या नादात स्वतःला मृत्यूच्या दारात घेऊन गेला; तरुणाची झालेली अवस्था जाणून हादराल

वजन कमी करण्याच्या नादात स्वतःला मृत्यूच्या दारात घेऊन गेला; तरुणाची झालेली अवस्था जाणून हादराल

लंडनमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय चाड टेक्सीरा (Chad Teixeira) यालाही आपलं वजन झपाट्याने कमी करण्याचं वेड लागलं. यासाठी त्याने अफाट प्रयत्न केले.

लंडनमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय चाड टेक्सीरा (Chad Teixeira) यालाही आपलं वजन झपाट्याने कमी करण्याचं वेड लागलं. यासाठी त्याने अफाट प्रयत्न केले.

लंडनमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय चाड टेक्सीरा (Chad Teixeira) यालाही आपलं वजन झपाट्याने कमी करण्याचं वेड लागलं. यासाठी त्याने अफाट प्रयत्न केले.

नवी दिल्ली 29 जानेवारी : स्लिम दिसणं, फिट राहाणं हे फक्त सौंदर्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही तितकंच महत्त्वाचं असतं. वाढतं वजन आणि शरीराचा वाढता आकार अनेक आजारांनाही आमंत्रण देतो. हे वाढत वजन तुमच्या हालचाली आपोआप कमी करतं, कारण तुम्ही लवकर थकता. यामुळे आळशीपणा वाढतो आणि मग हळूहळू हाडांवरील वाढत्या वजनामुळे विविध आजार जन्म घेतात. त्यामुळे स्वतःला नेहमी फिट ठेवणं गरजेचं आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय चाड टेक्सीरा (Chad Teixeira) यालाही आपलं वजन झपाट्याने कमी करण्याचं वेड लागलं. यासाठी त्याने अफाट प्रयत्न केले. तो वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी इतका उतवळा झाला की काहीही विचार न करता तो स्वतःलाच मृत्यूच्या दारात घेऊन गेला. वजन कमी करण्यासाठी त्याने इतकी रिस्क घेतली की थोडक्यात त्याचा जीव वाचला.

'घरात घुसू नकोस...', चक्क सापालाच शेतकऱ्याने धमकावलं; पुढे जे घडलं ते शॉकिंग

सर्जरी करून डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून जवळपास 18 लिटर फॅट काढलं (Fat Removal Operations). ही सर्जरी जवळपास 10 तास चालली. यानंतर त्याचं शरीरा सुजून आधीपेक्षाही मोठं दिसू लागलं. मात्र, हळूहळू ही सूज कमी झाली आणि तो सामान्य आकारात आला. यादरम्यान त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. या स्थितीतून रिकव्हर होण्यासाठी त्याला बरेच दिवस लागले. मात्र तरीही या वर्षी जानेवारी महिन्यात त्याने पुन्हा मेगा लिपोसक्शन, आर्म लिफ्ट प्रोसिजरच्या माध्यमातून 11 लिटर फॅट पुन्हा काढली.

याचा दुष्परिणाम असा झाला, की त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागली आणि त्याला रक्त भरावं लागलं. ब्लड क्लॉट आणि चेस्ट इन्फेक्शनसारख्या नव्या आजारांचा सामनाही त्याला करावा लागला. मात्र, इतकं सगळं होऊनही आपल्या भीती वाटत नसल्याचं चाडने सांगितलं. त्याला काहीही करून स्लिम व्हायचं होतं. याआधी त्याने डायटिंग, व्यायाम, जिम सगळं करून पाहिलं, मात्र काहीच फायदा झाला नाही. यामुळे त्याच्याकडे फक्त हाच पर्याय उरला होता.

दरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट

कोणत्याही परिस्थितीत स्लिम होण्याचा निर्धार केल्याने चाड मृत्यूच्या दारातही पोहोचला. त्याने थेरपीच्या माध्यमातून शरीरातील संपूर्ण फॅट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी लाखो रूपये खर्च केले आणि अखेर आपलं वजन कमी केलंच. मात्र, याकाळात त्याला इतक्या सर्जिकल प्रोसिजरमधून जावं लागलं की शरीराची अवस्था वाईट झाली. मात्र तरीही स्लिम होण्यासाठी आणखी सर्जरी कराव्या लागल्या तरी आपण तयार असल्याचं त्याने म्हटलं.

First published:

Tags: Weight, Weight loss