बर्लिन, 28 जानेवारी : अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं. पण प्रत्येकाची आवडती ठिकाणंही वेगवेगळी असतात. कुणाला डोंगराळ प्रदेशात, कुणाला बर्फाळ प्रदेशात तर कुणाला जंगलात फिरायला आवडतं. काही लोक असे असताना त्यांना चक्क अशा ठिकाणी फिरायला आवडतं, जिथं सहसा जाण्याची कुणी हिंमत करत नाही. खरंतर काही लोकांचं कामच ते असतं. अशीच एक व्यक्ती कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या घरात गेली आणि तिथे जाताच जे दिसलं ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला (Man open house closed from years).
जर्मनीतील अर्बन एक्सप्लोरलने अर्बेएक्सर गिआकाचिन कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या घरात गेला. तिथं तिने घराचा दरवाजा उघडला आणि त्याला दरदरून घामच फुटला. किंबहुना तो किंचाळत बाहेर पडला.
त्या घराच्या भिंती काळ्या पडल्या होत्या. घरातील कित्येक रूममध्ये भंगार पडलेलं होतं. एका खोलीत पाय ठेवला आणि त्याची नजर सीलिंगकडे देली. तेव्हा त्याच्या तोंडातून आधी शब्दच फुटेना. सीलिंगला त्याला असं काही लटकताना दिसलं, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. त्या सीलिंगला चक्क हाडांचे सापळे लटकत होते आणि हे सापळे कुत्र्याच्या हाडांचे होते (Dog Spines Found).
हे वाचा - दाल में कुछ काला है! ऑनलाईन मागवलेल्या डाळीच्या तडक्याने महिलेला 440 वोल्ट झटका
सुरुवातीला तो घाबरला पण त्यानंतर त्याने यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने घरातच शोध घेतला आणि रहस्याचा उलगडा झाला. घरातील एका खोलीत काही चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. त्या त्याने वाचल्या. त्यातून या घराच्या मालकाजवळ खूप कुत्रे असल्याचं समजलं. त्यामुळे हे हाडांचे सापळे त्यांचचेच होते, हे स्पष्ट झालं.
सोबतच काही बिल्सही, ज्याचा भरणा केलेला नव्हता. कदाचित या घराच्या मालकाने बिल भरलं नसावं आणि तो कर्जबाजारी झाला असावा. त्यामुळे पळून गेला असावा असा अंदाज अर्बन एक्सप्लोररने बांझला. या बिल्सचा या प्राण्यांशी काही संबंध आहे की नाही हे मात्र समजलं नाही.
हे वाचा - गर्लफ्रेंडच्या घरी बसून केलेल्या त्या कामानं पालटलं नशीब; तरुणाने कमावले 10 अब्ज
Abandoned Beauties Facebook Group वर या घराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावर लोकांनी बऱ्याच कमेंट दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. अशी प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे.
जर हे कुत्र्यांच्या हाडाचे सापळे असतील तर ही खूप भयंकर आहे, अशं एका युझर्ने म्हटलं आहे. काही लोकांनी घरातील हा भाग मीट स्टोरेज असावा असं म्हटलं आहे. पण त्याचवेळी मग कुत्रेच का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. लोक या घराबाबत आपाआपल्या तऱ्हेने रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral news, Viral photo