मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आधी शाकाहारी होता, आता 79 दिवसांपासून फक्त कच्चं मांस खातोय हा व्यक्ती; कारण जाणून व्हाल शॉक

आधी शाकाहारी होता, आता 79 दिवसांपासून फक्त कच्चं मांस खातोय हा व्यक्ती; कारण जाणून व्हाल शॉक

हा व्यक्ती मागील 79 दिवसांपासून प्राण्यांचं कच्च मांस खात आहे. इतकंच नाही तर तो गाय किंवा उंटाचं कच्च दूध पित असून कच्ची अंडीही खात आहे

हा व्यक्ती मागील 79 दिवसांपासून प्राण्यांचं कच्च मांस खात आहे. इतकंच नाही तर तो गाय किंवा उंटाचं कच्च दूध पित असून कच्ची अंडीही खात आहे

हा व्यक्ती मागील 79 दिवसांपासून प्राण्यांचं कच्च मांस खात आहे. इतकंच नाही तर तो गाय किंवा उंटाचं कच्च दूध पित असून कच्ची अंडीही खात आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 30 जानेवारी : चित्रपटांमध्ये तुम्ही अनेकदा एखाद्या व्यक्तीला ‘अपने दुश्मन को कच्चा चबा जाएंगे’ असं म्हणताना ऐकलं असेल. हा फक्त एक डायलॉग आहे. प्रत्यक्षात कच्च मांस खाणं कोणासाठीही हानिकारक ठरू शकतं. मात्र, एक व्यक्ती मागील 79 दिवसांपासून कच्च मांस खात आहे (Man Eating Raw Meat from Last 79 Days). अमेरिकेत राहणारा हा व्यक्ती सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो रोज कच्च मांस, कच्च दूध आणि कच्ची अंडी खात आहे.

ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी तरुणीनं बनवला प्लॅन; ऐकून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक

रॉ मीट एक्सपेरिमेंट (Raw Meat Experiment) नावाचं सोशल मीडिया अकाऊंट मागील काही काळापासून चांगलंच प्रसिद्ध होत आहे. कारण हे अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने स्वतःलाच असं चॅलेंज दिलं आहे, जे हैराण करणारं आहे. हा व्यक्ती मागील 79 दिवसांपासून प्राण्यांचं कच्च मांस खात आहे. इतकंच नाही तर तो गाय किंवा उंटाचं कच्च दूध पित असून कच्ची अंडीही खात आहे. हा व्यक्ती कच्च मांस खात आहे, ही बाब हैराण करणारी आहेच. मात्र यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे हा व्यक्ती हे ज्यासाठी करत आहे ते कारण.

या व्यक्तीने सांगितलं की तो हे सगळं केवळ आपल्या शरीराला चॅलेंज करण्यासाठी करत आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं, की तो दररोज कच्च मांस खातो आणि तोपर्यंत खात राहील जोपर्यंत त्याचा बॅक्टेरियाने मृत्यू होणार नाही. त्याने अकाऊंटवर हेदेखील लिहिलं, की हे सर्व करून त्याला हे बघायचं आहे की असं केल्याने तो ५ दिवस जिवंत राहील की ५०० दिवस. इन्स्टाग्रामवर तो दररोज आपले मांस खातानाचे व्हिडिओ शेअर करत राहातो.

नवरदेवासोबत मित्रही बसला घोडीवर अन्...; प्रताप पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO

या व्यक्तीने सांगितलं की आधी तो फक्त प्लांट डायटवर होता, यामुळे त्याची तब्येत जास्त बिघडत होती. त्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. तेव्हापासून त्याने मांस खाण्याचं डायट सुरू केलं. आता तो आपल्या शरीराला कच्च मांस खाण्याची सवय लावत आहे. मात्र यावेळी आपल्याला अनेक जंतूच्या संसर्गाचा धोका असल्याची भीतीही त्याला आहे. त्याने सांगितलं की तो अशा प्रकारचं अन्न यासाठी खात आहे, कारण पूर्वीचे लोक कच्च मांस खायचे आणि ते अनेक वर्ष जगायचे.

First published:

Tags: Health, Shocking news