मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी तरुणीनं बनवला मास्टर प्लॅन; ऐकून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक

ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी तरुणीनं बनवला मास्टर प्लॅन; ऐकून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक

हॅनाने म्हटलं की ब्रेकअपनंतर तिने अनोळखी मुलांना आपला नंबर म्हणून आपल्या एक्सचा नंबर दिला आणि यावर फोन करण्यास सांगितलं.

हॅनाने म्हटलं की ब्रेकअपनंतर तिने अनोळखी मुलांना आपला नंबर म्हणून आपल्या एक्सचा नंबर दिला आणि यावर फोन करण्यास सांगितलं.

हॅनाने म्हटलं की ब्रेकअपनंतर तिने अनोळखी मुलांना आपला नंबर म्हणून आपल्या एक्सचा नंबर दिला आणि यावर फोन करण्यास सांगितलं.

    नवी दिल्ली 30 जानेवारी : अनेकदा नात्यात विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर कमी होताच कपल एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. मुलगी असो किंवा मुलगी ब्रेकअप करणं दोघांसाठीही अवघड असतं. अनेक लोक यातून बाहेर पडतात मात्र अनेक लोक असेही असतात जे बदला घेण्याचा निर्धार करतात. असंच एका तरुणीनेही केलं. तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी जो प्लॅन (Girl took Revenge After Breakup) केला, तो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. महिलेनं स्वतःच्या फोटोवरच केली विचित्र कमेंट; Facebook ने केलं ब्लॉक द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये राहणाऱ्या हॅना पार्किंसन नावाच्या महिलेनं सोशल मीडिया साईट टिकटॉकवर एक व्हिडिओ (Tiktok Video) शेअर केला आहे. यात तिनं सांगितलं की तिचा ब्रेकअप झाला आहे. तिने सांगितलं की तिच्या बॉयफ्रेंडने तिला धोका दिला आणि यानंतर दोघंही वेगळे झाले. याचाच बदला घेण्यासाठी तिने अतिशय खास प्लॅन केला. हॅनाने म्हटलं की ब्रेकअपनंतर तिने अनोळखी मुलांना आपला नंबर म्हणून आपल्या एक्सचा नंबर दिला आणि यावर फोन करण्यास सांगितलं. यानंतर हे तरुण तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून हॅनाबद्दल विचारत असे. हे अनेक दिवस वारंवार सुरू होतं. तरुणीने सांगितलं की बदला घेण्यासाठी तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या आई-वडिलांना फोन केला नाही, किंवा त्याचं सामान बाहेर फेकण्याचं कामही केलं नाही. तिने त्यापेक्षा वेगळा प्लॅन केला. यामुळे हॅनाच्या एक्स बॉयफ्रेंडला वाटू लागलं की ब्रेकअपनंतर ती यातून बाहेर पडली आहे आणि अनेक मुलं तिच्या मागे लागली आहेत. वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय झालं नेमकं तिचा हा प्लॅन सोशल मीडियावर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. अनेक महिलांनी तर ही आयडिया आपणही करून बघणार असल्याचं सांगितलं. हॅनाने सांगितलं की या प्लॅनचा मोठा फायदा म्हणजे तिला कोणत्याही व्यक्तीला आपला नंबर द्यावा लागला नाही. यासोबतच तिला अनोखळी लोकांसोबत बोलावंही लागलं नाही. मात्र, या फोन्समुळे तिच्या एक्स बॉयफ्रेंडची झोप उडाली
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Break up, Viral news

    पुढील बातम्या