नवी दिल्ली 30 जानेवारी : लग्नसमारंभांमध्ये अनेकदा आपल्याला काही विनोदी घटनाही पाहायला मिळतात. विशेषतः वरातीत नवरदेवाचे मित्र नाचत असताना तर अनेक अजब प्रकार पाहायला मिळतात. यावेळी दारूच्या नशेत काही लोक असं काहीतरी करतात, जे पाहून सगळ्यांनाच हसू येतं. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की नवरदेवाचे मित्र वरातीत नागिन डान्स (Nagin Dance) करत असतात. लग्नांमध्ये नागिन डान्स अतिशय प्रसिद्ध आहे. मृत्यूच्या दारातून परत आला व्यक्ती; अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO तुम्ही पाहिलं असेल की नागिन डान्स करताना नवरदेवाचे मित्र अजब डान्स करत असतात. यादरम्यान काही मित्र नागिन बनण्याचा प्रयत्नही करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Funny Wedding Video) झाला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे, की पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात दिसतं की नवरदेवाचा एक मित्र नागिन डान्स करण्यासाठी असं काही करतो, जे पाहून नातेवाईक आणि वरातीतील सर्वच हैराण होतात.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बोहल्यावर बसून नवरदेव वरात घेऊन निघाला आहे. नवरदेवासोबत वरातीत भरपूर नातेवाईक आणि मित्रही आहेत. इतक्यात नवरदेवाचा एक मित्रच घोड्यावर चढतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की नवरदेव बोहल्यावर चढल्यानंतर मित्र अगदी झोपून नागिन डान्स करू लागतो. त्याचं हे कृत्य पाहून वरातीतील सगळे लोक हसू लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वरात निघताच नवरदेवाचा एक मित्र घोड्यावर बसतो. यानंतर तो अगदी खाली झोपून नागिन डान्स करू लागतो. त्याचं हे कृत्य पाहून सगळे वरातीतील लोक हसू लागतात. तर नवरदेव बिचारा आपल्या मित्राला काही बोलूही शकत नाही. तर मित्र डान्स करतच राहातो. छतावरुन उतरण्यासाठी पायऱ्यांचा घेतला आधार पण..; बाळाचा VIDEO पाहून व्हाल थक्क हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेवाच्या मित्र दारूच्या नशेत जे कृत्य करतो, ते पाहून सगळेच हसू लागतात. तरीही तो मित्र आपल्याच नादात राहातो आणि नागिन डान्स सुरूच ठेवतो. एकदा तर तो नवरदेवाच्या गालावर किसही करतो.