हा कुत्रा असं नेमकं का करतो आहे, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जर तुम्ही नीट पाहिलं तर हा कुत्रा आपल्या मालकाला सीपीआर (Dog gave cpr) देतो आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, या कुत्र्याचा मालक जमिनीवर पडतो. त्याला वाटलं आपला मालक बेशुद्ध झाला. म्हणून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्याचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड सुरू होते. तो त्याच्या छातीवर बसून लगेच त्याला सीपीआर देऊ लागतो. हे वाचा - उंदीर असावा तसं सापाकडे टकामका पाहत होतं मांजर; पुढे जे घडलं ते पाहूनच उडाल कुत्रा इतक्या सफाईने तो सीपीआर देतो आहे, जणू त्याला प्रशिक्षणच दिलं गेलं आहे. अगदी कित्येक लोकांनाही अद्याप सीपीआर देता येत नाही. सर्वात आधी तो पाहतो की आपल्या मालकाच्या शरीरात काही हालचाल होते आहे की नाही. त्यानंतर तो मालकाजवळ येऊन भुंकतो. आपण भुंकल्यानंतर आपला मालक जागा होतो की नाही ते तो तपासतो. मालक तरीही उठत नाही म्हणून तो त्याच्याजवळ येऊन त्याच्या हृदयावर कान ठेवतो आणि तिथून काही आवाज येतो आहे का ते पाहतो. त्यानंतर तो आपल्या पुढच्या दोन पंजांनी छातीवर दाब देतो, म्हणजेच सीपीआर द्यायला सुरुवात करतो. थोड्या वेळाने तो आपलं तोंड मालकाच्या तोंडाजवळ नेतो आणि त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का हे तपासतो. पुन्हा सीपीआर देतो आणि पुन्हा श्वास तपासतो. हे वाचा - शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण कदाचित या कुत्र्याच्या जागी एखादा माणूस असता तर त्याला असं काही सूचलंही नसतं. भले त्या व्यक्तीसोबत तसं काही वाईट घडलं नाही, पण तरी त्याचा जीव आणि वेळेचं महत्त्वं कुत्र्याने जाणलं. त्याला समोर जशी परिस्थिती दिसली त्यावर या कुत्र्याने लगेच कृती केली आहे, हे महत्त्वाचं आहे.जब शवासन आपका पसंदीदा आसन हो, और #Doggie को ग़लतफ़हमी हो जाए... Hilarious moment caught! 😂😂
VC-SM pic.twitter.com/s5vkyGrx31 — Dipanshu Kabra (@ipskabra) June 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pet animal, Viral videos