जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण

VIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण

VIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणाच्या माणुसकीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जून: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं असतात. पण यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांची हृदय जिंकून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत (man trying to save a bird) आहे. कोरोनाच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीला जात नसताना, संबंधित तरुणाने पक्षाचा जीव वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. विशेष म्हणजे त्याने तोंडाने श्वास देऊन मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या पक्षात प्राण फुंकला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतं असून संबंधित तरुणाचं अनेकजण कौतुक करत आहेत. संबंधित पक्षी एका स्विमिंग पूलाच्या बाजूला शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. कोणत्याही क्षणी पक्षाचा मृत्यू होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण एका तरुणाच्या कठोर प्रयत्नानंतर त्या पक्षाला जीवनदान मिळालं आहे. संबंधित व्यक्तीने या संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार संबंधित पक्षाचं नाव कुकाबुरा आहे. या पक्षाला वाचवण्यासाठी संबंधित तरुण सुरुवातीला पक्षाच्या छातीवर हळुवार प्रेशर देतो. पण याचा फारसा काही फायदा होतं नाही. त्यामुळे संबंधित तरुण कुकाबुरा पक्षाची चोच आपल्या तोंडात ठेवून त्याला मनुष्याप्रमाणे श्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच प्रयत्न दोन तीन वेळा करूनही फारसा फायदा झाला नाही. पण संबंधित व्यक्तीने हार मानली नाही.

जाहिरात

हे ही वाचा- माहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर छातीवर प्रेशर देऊन अथवा तोंडाने श्वास देऊनही काही फरक पडत नसल्याचं त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने एअर कंप्रेसरने श्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. एअर कंप्रेसरने श्वास दिल्यानंतर हा पक्षी दुसऱ्या क्षणात व्यवस्थित उठून बसला आहे. विशेष म्हणजे हा पक्षी पूर्णपणे बरा झाल्यानंतर, या पक्षात आणि संबंधित व्यक्तीमध्ये मैत्री झाली आहे. या माणसानं या पक्ष्याचं नाव जॉर्ज असं ठेवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात